मुंबई, 20 मे: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धा कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे स्थगित झाली. आयपीएल स्पर्धेच्या पुर्वार्धामध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी (KKR) निराशाजनक झाली आहे. आता आयपीएलच्या उत्तरार्धात केकेआरनं जोरदार कामगिरी केली तरच त्यांना 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेबरोबरच शाहरुख खाननं कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. या लीगमधील ट्रिनबॅगो नाईट रायडर्स (TKR) ही शाहरुखची टीम गतविजेती आहे. यावर्षी विजेतेपद राखण्यासाठी ही टीम कामाला लागली आहे. या तयारीचा भाग म्हणून त्यांनी चार जणांना वगळले आहे.
टीकेआरनं भारताचा अनुभवी लेग स्पिनर प्रवीण तांबे (Pravin Tambe), न्यूझीलंडचा टीम सीफर्ट, ऑस्ट्रेलियाचा फवाद अहमद आणि वेस्ट इंडिजच्या आमिर जंगू यांना वगळले आहे. यापैकी सीफर्ट हा कोलकाता नाईट रायडर्सचा देखील सदस्य आहे. त्याला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होत. टीम 18 मे रोजी कोरोनातून बरा झाला आहे.
BREAKING NEWS!!! The @TKRiders announce 2021 retentions. Read more ▶️ https://t.co/djGJHd53aW #CPL21 #CPLDraft #CricketPlayedLouder #TrinbagoKnightRiders #KnightRiders pic.twitter.com/eU9jj86s9t
— CPL T20 (@CPL) May 6, 2021
ब्राव्होला केले ट्रेड
टीकेआरनं आणखी एक मोठा निर्णय घेत अनुभवी ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याला सेंट किट्स टीमसोबत ट्रेड केले आहे. ब्राव्होला दिनशे रामदीनच्या बदल्यात ट्रेड केले आहे. कायनर पोलार्ड (Kieron Pollard) टीकेआर टीमचा कॅप्टन असून त्याच्या कॅप्टनसीखाली या टीमनं मागील सिझनमध्ये सर्व मॅच जिंकत विजेतेपद पटकावले होते. शाहरुख खान या टीमचा मालक असून ही सीपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे.
महिला क्रिकेटमधील 'महेंद्रसिंह धोनी'नं न्यूड फोटो शेअर करत उडवली होती खळबळ
भारतीय लेग स्पिनर प्रवीण तांबेचा मागच्या वर्षी या टीममध्ये समावेश झाला होता. तांबे आता 49 वर्षाचा झाला आहे. मागच्या वर्षी त्यानं 3 मॅचमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. तांबे सध्या कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या कोचिंग स्टाफचा सदस्य आहे. तो राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लॉयन्स या टीमकडून आयपीएल खेळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Shah Rukh Khan, West indies