नाशिक, 20 मे : ‘माझी भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जनतेची भूमिका एकच आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकताय. पण मराठा समाजाला याचं घेणे-देणे नाही. टिमटीम करणारे माझ्या भूमिकेवर बोट ठेवत आहे. मी छत्रपतींचा वंशज,मला कोणी शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. भाजपचे खासदार संभाजीराजे दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (maratha reservation) रद्द केल्यामुळे संभाजीराजे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली. सुरक्षित भविष्यासाठी इथे करा गुंतवणूक, सरकारी गॅरंटीसह मिळेल अधिक परतावा ‘मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार या आधी मार्ग काय काढणार? हे सांगा. मी महाराष्ट्र पिंजून काढतोय, अभ्यासू लोकांशी चर्चा करतोय. त्यामुळे येत्या 27 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. सगळ्या आमदार, खासदारांना माझी वार्निंग आहे, मराठा समाजाला विनंती आहे की, 27 मेपर्यंत शांत राहा, असं आवाहन संभाजीराजेंनी केले आहे. जे हातात आहे ते करा, हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. नोकरी देण्यात काय अडचण आहे. सारथीला दिलेलं, शाहू महाराजांचे नाव काढून टाका. आताच्या सरकारची भूमिका अयोग्य आहे, अशी टीकाही संभाजीराजे यांनी केली. माझी भूमिका ही समाजाची भूमिका आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 4 वेळा भेटीसाठी परवानगी मागितली. सर्वपक्षीय नेत्यांना विनंती की समाजाची दिशाभूल करू नका. जबाबदारी झटकू नका,समाजाला दिलासा द्या. आंदोलन कसं करायचं हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. मला आक्रमक व्हायला 2 मिनिटं लागतील. 102 व्या घटनादुरुस्तीवर 27 मे रोजी बोलणार, असंही संभाजीराजे म्हणाले. 2 वर्षाच्या मुलाची सानियाला काळजी, क्रीडा मंत्रालयानं मागितली ब्रिटनची मदत 27 मे पर्यंत सरकारने अभ्यास करावा,चिंतन करावं. उद्या माणसं मेले तर जबाबदार कोण? मी समाजाला दिशाभूल करत नाही दिशा देतो. त्यामुळे राज्य सरकारच्या हातात काही गोष्टी आहे. नियुक्तीची प्रक्रिया का रखडवताय. प्रलंबित असलेल्या नोकऱ्या तातडीनं मार्गी लावा, पदोन्नती आरक्षण 7 मेचा GR, सुप्रीम कोर्ट गाईडलाईननुसार योग्य आहे, असंही संभाजीराजे म्हणाले. ‘इतर राज्यात आरक्षण मिळालं. मग महाराष्ट्रात का नाही? राज्य सरकारला मी स्वतः सूचना दिल्या होत्या. पण माझ्या काही सूचना त्यांनी सुप्रीम कोर्टात मांडल्या नाही. आता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र निर्णय घ्यावा, माझ्यासाठी मराठा समाज महत्वाचा आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.