• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मोदींसोबत आमचे जुने संबंध, त्यामुळे..., संजय राऊतांचं मोठं विधान

मोदींसोबत आमचे जुने संबंध, त्यामुळे..., संजय राऊतांचं मोठं विधान

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांमध्ये अर्धा तास वन टू वन चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील'

 • Share this:
  मुंबई, 08 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्यामध्ये बंद दाराआड 30 मिनिटं चर्चा झाली. चर्चा सुरू झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचे जुने संबंध आहे, त्यामुळे वेगळा अर्थ काढू नये, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सुरू असलेल्या चर्चांना उत्तर दिली. राज्यातील 12 वेगवेगळ्या मुद्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता भेट झाली तर चर्चा तर होणारचं आहे. चर्चा सुरू झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे,  केंद्राने मराठा आरक्षण विषय सोडवावा, कांजूरमार्ग मेट्रो शेड, अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, असं राऊत म्हणाले. ठाकरे-मोदी भेट म्हणजे, 'आपण एकत्र येऊया, पुन्हा लग्न लावुया', उदयनराजेंचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांमध्ये अर्धा तास वन टू वन चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.  राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत त्यांनी काढावेत. मोदींसोबत जुने संबंध आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नेहमीच आम्हाला आदर आहे, असं सूचक विधानही राऊत यांनी केलं. या भेटीमुळे नवीन सत्ता समीकारणाचा इथं विषय नाही. भाजपसोबत आमचा संघर्ष कायम नाही. केव्हा तरी त्याला पूर्णविराम द्यावा लागतो. केंद्राचा आणि राज्याचा संवाद वाढतोय, ही चांगली बाब आहे, असंही राऊत म्हणाले. दलितांना घोड्यावरून वरात काढू देणार का? नवरदेवाच्या FB पोस्टने खळबळ बाहेर बैठक सुरू असताना दोन महत्त्वाचे शिलेदार बाहेर उभे होते. भाजपचे अंदाज आतापर्यंत नेहमीच चुकत आले आहेत. त्यांना वाटलं होतं दहा पंधरा मिनिटं चर्चा होईल मोदींनी 90 मिनिटं वेळ दिला, असा टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.
  Published by:sachin Salve
  First published: