बुंदेलखंड, 8 जून : आपलं लग्न काही दिवसांवर आलं असताना तरुणांना लिहिलेल्या फेसबुक पोस्टवरून (Facbook Post) चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानं आपल्या लग्नानंतर वरातीमध्ये घोड़्यावर किंवा मोटारीमध्ये बसायला मिळावे, यासाठी आपल्याला कोण मदत करेल का? अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिली. धक्कादायक म्हणजे त्यांच्या गावात घोड्यावरून वरात काढण्यास दलितांना परवानगी नाही. त्याचीही फेसबुक पोस्ट पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून स्वतंत्र भारतामध्ये आजही या गावात दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्यास परवानगी कशी काय नाही? असा सवाल अनेकांनी केला आहे.
हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बुंदेलखंडच्या महोबा जिल्ह्यातील एका गावातील आहे. गावात दलितांना घोड्यावरून किंवा घोडागाडीतून लग्नाची वरात काढण्याची परवानगी नाही. संबंधित तरुणाचं 18 जून रोजी लग्न आहे. मात्र, लग्नामध्ये घोड्यावरून वरात काढता येणार नाही, या विचारानं 22 वर्षीय हा तरुण खूपच चिंतेत आहे. तो कुटुंबीयांकडे हट्ट करून रडत देखील आहे, असे सांगण्यात येत आहे. यासाठी त्यानं अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर फेसबुकवर पोस्ट लिहिली असून त्यामध्ये त्यानं असं लिहिलंय की, बुंदेलखंडमध्ये एखादा असा राजकीय पक्ष आहे का, जो दलितांना घोड्यावर किंवा वाहनात बसण्याचा अधिकार देऊ शकतो. या खाली महोबा माधवगंज असं लिहून त्यांन आपला मोबाईल नंबर दिलेला आहे. त्याची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला.
22 वर्षीय तरुण अलखराम याचे घोड्यावरून वरात काढण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सध्या अनेक प्रयत्न करत आहे. गावातील जातीयवादी, मालदार लोक गावातून दलितांची वरात काढू देत नाहीत. त्यामुळे अलखरामचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या वडिलांनी महोबकंठ ठाण्यामध्ये विनंती पत्रसुद्धा दिलं आहे.
दोन हजार लोकसंख्या असलेल्या माधवगंज आवाज स्वातंत्र्यानंतर 74 वर्षात एकाही दलिताची वरात घोड्यावरून निघालेली नाही. या गावातील जातीयवादी कर्मठ लोक त्यांना घोड्यावर बसून काढण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत देत नाहीत. या गावातील वयोवृद्ध लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या आयुष्यात आजपर्यंत कोणत्या दलिताची वरात घोड्यावरुन निघाले चे पाहिले नाही.
हे वाचा - तुमच्या Phone मध्ये आवाज क्लियर येत नाहीये, घसबसल्या अशी सोडवा समस्या; पाहा सोप्या ट्रिक्स
दरम्यान, या पोस्ट नंतर त्याच्या मदतीला आता भीम आर्मी समोर आली आहे. त्यांनी अलख राम ची वरात घोड्यावरून काढल्यास ची तयारी सुरू केली आहे. तर भाजपचे आमदार वज्र भूषण राजपूत यांनीही त्याला फोन करून त्याच्याशी चर्चा केली. लग्नामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याचे आश्वासन दिले. दोघांमधील या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.