मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे-मोदी भेट म्हणजे, 'आपण एकत्र येऊया, पुन्हा आपलं लग्न लावुया', उदयनराजेंचा थेट आरोप

ठाकरे-मोदी भेट म्हणजे, 'आपण एकत्र येऊया, पुन्हा आपलं लग्न लावुया', उदयनराजेंचा थेट आरोप

यातून आपण एकत्र येऊयात, आपलं लग्न पुन्हा लावुयात आणि समाजाला शांत करुयात,' असंच होणार अशी टीका उदयनराजेंनी केली.

यातून आपण एकत्र येऊयात, आपलं लग्न पुन्हा लावुयात आणि समाजाला शांत करुयात,' असंच होणार अशी टीका उदयनराजेंनी केली.

यातून आपण एकत्र येऊयात, आपलं लग्न पुन्हा लावुयात आणि समाजाला शांत करुयात,' असंच होणार अशी टीका उदयनराजेंनी केली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 जून : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये राज्याशी संबंधित विविध विषयांबरोबरच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर चर्चा झाली आहे. मात्र या भेटीचे काही राजकीय अर्थदेखिल काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असताना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मात्र ही भेट म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलेली राजकीय तडजोड असल्याचा थेट आरोप केला आहे. अत्यंत गंभीर अशी टीका उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

(वाचा-या बँकेत खातं असेल तर आजच जवळच्या शाखेत करा संपर्क, अन्यथा खोळंबतील आर्थिक कामं)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सगळीकडं वातावरण पेटलेलं आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायला गेले मात्र ते त्यांच्याशी नेमकं बोलणार काय? भेटीपूर्वी दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन किमान चर्चा करायला हवी होती. त्या आधारावर पंतप्रधानांशी चर्चा करता आली असती. पण त्यांनी तसं न करता थेट भेट घेतली. याचा अर्थ काय लावयाचा. राजकीय तडजोड करण्यासाठीच पंतप्रधान गेले असल्याचं उदयनराजे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. आरक्षण प्रश्नावर तडजोड करण्यासाठी दिल्लीला गेले का असा आरोपही त्यांनी केला.

(वाचा-मोठी बातमी! पुण्यातील पाण्यातही सापडला कोरोनाव्हायरस; संसर्गाचा धोका किती?)

आपलं लग्न पुन्हा लावुया!

यावेळी उद्यनराजे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे मोदींना भेटणार आणि बोलणार काय. तुम्ही असं केलं तर आम्ही तसं करतो. आपण पुन्हा एकत्र येऊयात असंच हे बोलणार ना? म्हणजे परत राजकीय सत्तांतर होणार. यात देवाण-घेवाणचं होणार ना. राज्याच सध्या एवढी प्रकरणं घडत आहेत. मग काहीतरी होणार माहिती असल्यामुळं तर तडजोड नाही ना. मग यातून आपण एकत्र येऊयात, आपलं लग्न पुन्हा लावुयात आणि समाजाला शांत करुयात,' असंच होणार अशी टीका उदयनराजेंनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण या सर्वांनी पंतंप्रधानांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर समाधानकारक चर्चा झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या भेटीनंतर तरी राज्याच्या राजकारणाचा पारा वाढवलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी काही तोडगा निघणार का हे पाहावं लागेल. मात्र उदयनराजेंच्या या आरोपामुळं आणकी नव्या चर्चांना सुरुवात होणार हेही नक्की.

First published:

Tags: BJP, Narendra modi, Shivsena, Udayan raje bhosle, Uddhav tahckeray