'फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण त्यांचं कौतुक वाटतं की...', नव्या सरकारबाबत काय म्हणाले राऊत?
'फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण त्यांचं कौतुक वाटतं की...', नव्या सरकारबाबत काय म्हणाले राऊत?
फडणवीस यांच्याकडे नेहमी माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं होतं. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला खूप जड जात आहे, असं राऊत म्हणाले.
मुंबई 02 जुलै : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असा सर्वांचाच अंदाज होता. मात्र, ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंचं सुरतेच्या स्वारी आधीच ठरलं होतं? पडद्यामागची INSIDE STORY
फडणवीस यांच्याकडे नेहमी माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं होतं. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला खूप जड जात आहे, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत बसलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री व्हा असा आदेश दिला जातो आणि ज्युनिअर मंत्री असलेल्या दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास कोणाला आनंद होईल? असा सवालही त्यांनी केला. मात्र, फडणवीसांनी पक्षाचा आदेश मानला. याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं, असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवर टीकाही केली. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईतील शिवसेनेची ताकद नष्ट करायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदुक ठेवली आहे. मुंबईत शिवसनेनेचाच पराभव करण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आहे. जनतेला भ्रमिष्ट करणं ही भाजपची रणनीती आहे आणि शिंदेही आता याच मार्गाने जात आहेत, असंही राऊत म्हणाले.
'मराठा म्हणून एकनाथ शिंदे..'; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
शुक्रवारी जवळपास 10 तास ईडीने संजय राऊत यांची चौकशी केली. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांना समन्स बजावलं होतं. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. जर काही चुकीचं केलं नसेल तर आत्मविश्वासाने जाता येतं, म्हणून मी ईडीच्या कार्यालयात गेलो. मलाही मार्ग मोकळा होता गुवाहाटीला जाता आलं असतं. मात्र, शिवसैनिक एकनिष्ठच असतो, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.