Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंचं सुरतेच्या स्वारी आधीच ठरलं होतं? पडद्यामागची INSIDE STORY

एकनाथ शिंदेंचं सुरतेच्या स्वारी आधीच ठरलं होतं? पडद्यामागची INSIDE STORY

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अधक्ष जे पी नड्डा यांच्या संपर्कात एकनाथ शिंदे होते.

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अधक्ष जे पी नड्डा यांच्या संपर्कात एकनाथ शिंदे होते.

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अधक्ष जे पी नड्डा यांच्या संपर्कात एकनाथ शिंदे होते.

मुंबई, 02 जुलै : शिवसेनेत (shivsena) बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. पण, अचानक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री कसे झाले असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. पण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) हे आधीपासूनच भाजपच्या केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते, मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन घेऊनच त्यांनी सुरतला रवाना झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुका होताच एकनाथ शिंदे 33 आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अधक्ष जे पी नड्डा यांच्या संपर्कात एकनाथ शिंदे होते.  दोन वेळा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली जाऊन चर्चा केली होती.   पण हा मुद्दा होता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळेल का? याबाबत आश्वासन घेण्याबाबत नाही तर अचानकपणे शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस शामिल का होत नाही याबाबत… शेवटपर्यंत एकनाथ शिंदे याबाबत चर्चा करत होते पण ठोस काही समोर येत नसल्याने रविवार सोमवारचा म्हणजेच २५-२६ जूनचा शपथविधाचा मुहूर्त टळला.  तर दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील याची गुप्तता बाळगून ठेवली. (शूटिंगचा पहिला आठवडा आदितीसाठी होता कठीण, काय आहे कारण?) एकनाथ शिंदे यांनी 51 आमदार असल्याचा दावा केला आहे.  त्यामुळे राज्यात ठाकरे सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झालं पण नवीन सरकार कधी येणार याची चर्चा जोर धरू लागली होती. पण देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते पण ठाण्यात चर्चा वेगळीच होती अर्थात ती फक्त एक चर्चा होती, जी पुढे जावून खरी ठरली. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. आता सोमवारी शिंदे हे बहुमत सिद्ध करणार की नाही हे पाहण्याचे ठरणार आहे. 11 महत्त्वाचे मुद्दे 1- एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपद दिले जाणार हे निश्चित होते. तरी देखील भाजपाचे नेते एकनाथ शिंदेंसोबत सतत होते याचा अर्थ भाजपाला कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकार पाडायचे होते तसा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील वरीष्ठांना दिला होता. 2. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते पण त्यांचे मन वळवण्यासाठी भाजपचे आणि देंवेद्र फडवीसांची खास व्यक्ती एकनाथ शिंदे सोबत होते. 3. आपण सत्तेचे लालची नाही आहोत हे दाखवण्याकरता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले 4..देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारमध्ये का शामिल होणार नाहीत. हे जाहीररित्या बोलून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द पाळला 5. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू मंत्री कोण असतील तर ते एकनाथ शिंदे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना सत्ता दिला आणि आपण दिलेला शब्द पाळतो हे सिद्ध केलं 6. ज्या पद्धतीने राजकीय इतिहासातील सर्वात मोठा बंड एकनाथ शिंदे यांनी केला तो बंड पुढे थंड झाला आणि आपले सरकार पडले तर आपली राजकीय कारकिर्द धोक्यात येईल असं वाटल्याने देवेंद्र फडणवीस यांनी ही मुख्यमंत्रिपदाची खेळी खेळली. 7. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे पण इतर आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे पहाटेचाशपथविधी करुन ७२ तासात सरकार कोसळलं तसं पुन्हा होईल याची भिती असल्याने मैत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी हे संकट आपल्यावर घेतले आहे 8. जर शिंदे सरकार कोसळलं तर आपली राजकीय कारकिर्द कायम रहावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे संकट आपल्या अंगावर घेवून मैत्री निभावली जेणेकरुन भविष्यात देवेंद्र फडणवीस हात देतील आणि एकनाथ शिंदे पुन्हा जोमाने उभे राहतील 9. सत्तेची अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांना देवून पुढील ५ वर्ष मुख्यमंत्रिपदाचा रस्ता देवेंद्र फडणवीस यांनी मोकळा केला. 10. या सर्व मागे एकमेकांचे राजकीय डाव आहेत, कुरघोडी आहे की विश्वासाचे गणित आहे की लवकरच लागण्या-या विधान सभेच्या निवडणुकांची नांदी आहे 11. एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर देवेंद्र फडणवीस यांचे देखील भवितव्य देखील अवलंबून आहे का? शिंदे सरकारचा अडीच वर्षांचा काळ यशस्वीरित्या पार पाडून द्यायचा आणि एकनाथ शिंदेंसारखा मास लीडर आपल्या गटात घेवून येणाऱ्या पालिका निवडणुकीत आपला पताका फडकवायचा असा डाव भाजपाचा आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maharashtra News

पुढील बातम्या