मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'नामांतर स्थगितीच्या निर्णयाबद्दल फडणवीसांना विचारा, शिंदेंना नको, कारण..'; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

'नामांतर स्थगितीच्या निर्णयाबद्दल फडणवीसांना विचारा, शिंदेंना नको, कारण..'; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राऊत म्हणाले की नामांतराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने का घेतला हे तुम्ही फडणवीसांना विचारा. मुख्यमंत्र्यांना विचारू नका, कारण त्यांच्या हातात काहीच नाही.

राऊत म्हणाले की नामांतराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने का घेतला हे तुम्ही फडणवीसांना विचारा. मुख्यमंत्र्यांना विचारू नका, कारण त्यांच्या हातात काहीच नाही.

राऊत म्हणाले की नामांतराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने का घेतला हे तुम्ही फडणवीसांना विचारा. मुख्यमंत्र्यांना विचारू नका, कारण त्यांच्या हातात काहीच नाही.

मुंबई 15 जुलै : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने (Shinde Government) स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad as Sambhajinagar), उस्मानाबादचं (Osmanabad New Name) नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे सरकारचं मोठं पाऊल; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या 5 निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याचं काल समजलं. आताच उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. हे तिन्ही निर्णय फिरवल्याचं खरं असेल तर सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे. ठाकरेंनी अतिशय हिमतीने हा निर्णय घेतला होता. जर शिंदे सरकारने या निर्णयाला स्थघिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. राऊत म्हणाले की नामांतराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने का घेतला हे तुम्ही फडणवीसांना विचारा. मुख्यमंत्र्यांना विचारू नका, कारण त्यांच्या हातात काहीच नाही. राज्यात खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडवणीसच आहेत, असंही राऊत यावेळी म्हणाले.

...जेव्हा मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर आला एकनाथ शिंदेंचा फोन, शिवसैनिकानं सांगितला भावुक अनुभव

पुढे त्यांनी म्हटलं, की राजकीय निर्णय, आर्थिक निर्णय समजू शकतो, पण हा नामांतर स्थगितीची निर्णय का? औरंगजेब अचानक तुमचा नातेवाईक कसा झाला? उस्मान तुमचा कोण लागतो? असा सवाल राऊतांनी केला. आम्ही धाराशिव केलेलं नाव तुम्ही परत उस्मानाबाद ठेवताय. हे सरकार गोंधळलेलं आहे. त्यांचा मेंदू बधिर झाला आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut