मुंबई 15 जुलै : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने (Shinde Government) स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad as Sambhajinagar), उस्मानाबादचं (Osmanabad New Name) नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील नाव देण्याचा निर्णय शेवटच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतला होता. या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.
राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत ही स्थगिती दिली गेली आहे. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविरोधात आक्षेप घेतला होता. हे तिन्ही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकार कोसळण्यापूर्वी 29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. याच निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Uddhav thackeray