जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ...जेव्हा मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर आला एकनाथ शिंदेंचा फोन, शिवसैनिकानं सांगितला भावुक अनुभव

...जेव्हा मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर आला एकनाथ शिंदेंचा फोन, शिवसैनिकानं सांगितला भावुक अनुभव

...जेव्हा मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर आला एकनाथ शिंदेंचा फोन, शिवसैनिकानं सांगितला भावुक अनुभव

मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा फोन आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जुलै : शिवसेनेत गेल्या महिनाभरात जोरदार घडामोडी (Crises in Shivsena) घडत आहेत. शिवसेना आमदारांचा मोठा गट सध्या मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आहे. काही महानगपालिकेतील नगरसेवक देखील या गटामध्ये सहभागी झालेत. शिंदे गटानं आपलाच पक्ष खरा शिवसेना असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला तो दावा मान्य नाही. शिवसेनेचे दोन्ही गट सुप्रीम कोर्टातही आमने-सामने आहेत. या सर्व घडामोडीमध्ये शिवसेना नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत असतानाच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. शिवसेनेचे कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. साळवी यांनीच याबातचा खुलासा केल्याचं वृत्त ‘दैनिक हिंदुस्थान’नं दिलंय. काय घडला प्रसंग? कल्याणमधील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना साळवी यांनी ही माहिती दिलीय. ‘मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. कुणाचा फोन आहे हे समजताच उद्धव ठाकरे दुसऱ्या खोलीत गेले. त्यांनी परत आल्यानंतर मला एकनाथ शिंदे काय बोलत आहेत, हे विचारलं नाही. आपले गुरू इतके साधे आहेत.’ असा अनुभव सांगताना साळवी चांगलेच भावुक झाले होते. साळवी यांचा हा अनुभव ऐकल्यानंतर मेळाव्याला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांचे डोळे देखील पाणवले. फडणविसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, संजय राऊतांचा दौरा, नागपुरात भेट होण्याची शक्यता कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची डोकेदुखी वाढलीय. कल्याण, डोबिंवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. काही जणांनी अद्यापही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नसून साळवी त्यापैकीच एक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात