राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोण उमेदवार? वर्षा बंगल्यावर खलबतं; मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
Rajya Sabha Election: मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली.
मुंबई, 21 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सहावी जागा शिवसेनेचीच
वर्षा निवासस्थानी बैठक झाल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो पक्ष पुढे नेईन. केवळ राज्यसभा निवडणुकीच्या विषयावरच चर्चा झाली असं नाही इतरही विषयांवर चर्चा झाली. काही आमदार सुद्धा उपस्थित होते. मराठा संघटनांचं म्हणणं आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांचंही काही म्हणणं आहे आणि शिवसेनेचाही एक मुद्दा आहे. आमच्या सर्वांचं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की, सहावी जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेल आणि विजयी होईल.
वाचा : संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, पण सोमवारपर्यंत राजेंचा होकार न आल्यास...संभाजीराजे आमचेच...
संजय राऊत म्हणाले, आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की, सहाव्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडूण जाईल. छत्रपती संभाजीराजे हे आमचेच आहेत. त्यांचं आमचं एक नातं आहे. आम्ही त्यांना विनंती केलीय की, जर तुम्हाला ही निवडणूक लढायची असेल तर शिवसेनेत आपण या. मग त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. यात कुणाच्या भावना दुखवायचं कारण नाहीये.
जागा शिवसेनेची आहे. आम्हाला राज्यसभेत आमची एक जागा वाढवायची आहे. मागील वेळेस राष्ट्रवादीने आपली एक जागा वाढवली. पुढीलवेळी आणखी एखादा पक्ष वाढवेल. घाट्यात आम्ही आहोत. शिवसेना हा शिवसेनेचा उमेदवाराच पाठवण्यावर ठाम आहे असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा : "राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात घोडेबाजार, आकडे आणि मोड दोन्ही..." म्हणत शिवसेनेने घेतला मोठा निर्णयराज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण?
संजय राऊत पुढे म्हणाले, सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, उर्मिला मातोंडकर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण? या प्रश्नावर संजय राऊत यांनी म्हटलं, मला माहिती नाही. नावे चर्चात खूप असतात. चर्चा होत असतात. पण त्या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.