Home /News /mumbai /

Rajya Sabha Election: संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्यास शिवसेना दुसरा उमेदवार देणार

Rajya Sabha Election: संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्यास शिवसेना दुसरा उमेदवार देणार

संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, पण सोमवारपर्यंत राजेंचा होकार न आल्यास...

संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, पण सोमवारपर्यंत राजेंचा होकार न आल्यास...

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याचं संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी जाहीर केलं आहे. यासाठी संभाजीराजेंनी सर्व पक्षांना समर्थन देण्याचं सुद्धा आवाहन केलं आहे.

मुंबई, 21 मे : राज्यसभेच्या रक्त झालेल्या सहा जागांच्या निवडणुकांसाठी (Rajya Sabha Election) राजकीय घटामोडींना वेग आला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आवश्यक इतकी मते कुठल्याच राजकीय पक्षाकडे नाहीयेत. त्याच दरम्यान सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. इतकेच नाही तर संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यातच शिवसेनेने (Shiv Sena) सुद्धा ही जागा लढवण्याचं म्हटलं. त्यानंतर संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली. मात्र, यावर अद्याप संभाजीराजेंकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. आता संभाजीराजेंच्या निर्णयाची शिवसेना सोमवारपर्यंत वाट पाहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवबंधन बांधा आणि उमेदवारी मिळवा या ऑफरवर संभाजीराजेंच्या निर्णयाची शिवसेना सोमवारपर्यंत वाट पाहणार आहे. सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्या शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच संभाजीराजेंनी ऑफर नाकारल्यास सेनेकडून कुणाला संधी मिळणार? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. वाचा : "राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात घोडेबाजार, आकडे आणि मोड दोन्ही..." म्हणत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झालं? 1) संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोतच असणार. 2) राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर संभाजीराजे सोबतच रहाणार. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकिय निर्णयांना संभाजीराजेही शिवसेना पक्ष निर्णायासोतच रहाणार. 3) अगामी सर्व निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीराजे शिवसेनेचा प्रचार करणार 4) शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती असले तरी संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे 23 वे खासदार म्हणूनच कार्यरत राहणार. 5) युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला सोबत घेऊन "स्वराज्य" ही संघटना स्थापन करीत स्वत:ची राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून घोषणा केली. तसंच सर्व पक्षांच्या आमदारांनी त्यांनी मतदान करावं अशी त्यांनी पत्राद्वारे विनंतीही केली. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Shiv sena, राज्यसभा

पुढील बातम्या