मुंबई, 06 एप्रिल : राज्यातील राजकारणात ठाकरे कुटुंबीय नेहमीत चर्चेत राहणारं आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष असतंच. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकमेंकांबाबत काय बोलतात याचीही सर्वांना उत्सुकता असते. राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबतची भूमिका, त्यांनी सरकारला दिलेले सल्ले याबाबत माहिती दिली. मात्र यावेळीच राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला आहे. (Raj Thackeray PC)
राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंबरोबर झूम मिटींगद्वारे झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी 'किंबहुना' या शब्दाचा वापर केला. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे 'किंबहुना हा शब्द वापरला तर चालेला ना', असं विचारलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणाची एक वेगळी शैली आहे. त्यानुसार तो बोलताना किंबहुना शब्दाचा अनेकदा वापर करतात. त्यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स तयार होतात, जोक्स शेअर होतात. हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर मिश्किलपणे खोचक टोला मारला.
(हे वाचा -Raj Thackeray PC : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा)
याच पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं राज ठाकरे यांना सरकारविषयी प्रश्न केला. सरकार लोकांची काम करण्याऐवजी बदनामीमध्येच जास्त अडकत आहे असं वाटतं का? असा प्रश्न राज ठाकरेंन केला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मला काल कोणीतरी एक विनोद पाठवला होत, त्यात उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय? असा उल्लेख होता, असं राज ठाकरेंनी म्हटलं. यावर लगेचच पत्रकारांमध्ये हशा पिकला होता.
वाचा - काय घडलं ठाकरे बंधूंच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये? राज ठाकरेंच्या 10 सूचना
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना एकापाठोपाठ एक राज्यावरील मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर सरकारमधील काही मंत्र्यांवरील आरोपामुळंही त्यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी त्यांना अशा प्रकारचा टोला मारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chief minister, Cm, Maharashtra, Mumbai, Raj Thackeray, Uddhav thackeray