मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Raj Thackeray PC : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा

Raj Thackeray PC : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा. या सर्व विद्यार्थ्यांना पुढे ढकला. परीक्षा न घेता पास करा. त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल सांगता येत नाही, अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे.

  • Published by:  Karishma

मुंबई, 6 एप्रिल : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. त्या चर्चेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती देण्यासाठी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या चर्चेदरम्यान राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांबद्दल, शैक्षणिक वर्षाबद्दल महत्त्वाच्या सूचना केल्या. दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा. या सर्व विद्यार्थ्यांना पुढे ढकला. परीक्षा न घेता पास करा. त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल सांगता येत नाही, अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे.

शाळा बंद आहेत, तरी फी मात्र पूर्ण घेतली जात आहे. शाळांनी फी घेऊ नये. खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमोट केलं तसंच दहावी-बारावी विद्यार्थ्यांनाही करा. ही मुलं कोणत्या मानसिकतेतून जात असतील माहिती नाही.

दुसऱ्या लाटेची लक्षणं जानेवारीत दिसली होती. तात्काळ पावलं का उचलली गेली नाहीत, असा सवालही त्यांनी केला. तसंच लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. लसीकरणाला वयाचं बंधन नसावं. कोरोनाची दुसरी लाट खूप मोठी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, परप्रांतिय जास्त येतात. त्यांची चाचणी करणं महत्त्वाचं आहे. लॉकडाउनमुळे सर्वाचीच वाताहत होते. आठवड्यातून दोन- तीन दिवस दुकानं सुरू असतावीत. छोट्या व्यापाऱ्यांना करात सवलत द्यावी. वीजबिल माफ करुन दिलासा द्या असंही ते म्हणाले. तसंच अनिल देशमुखांचा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचं त्यांनी म्हटलं.

First published:

Tags: Raj thackarey