1. बाहेरुन येणाऱ्यांची चाचणी आवश्यक होती- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त का? याविषयी राज ठाकरे म्हणाले की, 'मी मागणी केली होती की, जे लॉकडाऊनमध्ये बाहेरच्या राज्यात गेले आहेत ते परतले की त्यांची मोजणी करा आणि चाचणी देखील करा की यांना कोरोना नाही ना. ही चाचणी तर नाही झाली आणि त्यांची मोजणी देखील झाली नाही'
2. उत्पादनाबाबत- जे छोटे व्यापारी आहेत त्यांना उत्पादन सुरू ठेवण्यास सांगितलं आहे पण विक्री न करण्यास करण्यास सांगितलं आहे. असं केलं तर ते उत्पादन ठेवायचं कुठं असा प्रश्न आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना दोन दिवस विक्री सुरू ठेवण्याची सूचना राज ठाकरे यांनी दिली आहे. तसंच छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं सुरू करण्यास परवानगी द्या.
3. बँकांविषयी- या सगळ्या दिवसात व्यवसाय बंद आहेत. अनेकांनी कर्ज घेतली आहेत. पण लोकांकडे पैसे असतील तर ते पैसे बँकांकडे परत जातील. राज्य सरकारने सर्व बँकांशी बोलून घ्यावं. कारण अनेक ठिकाणी त्याची सक्तीने वसुली केली जात आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, अशावेळी हप्ते कसे भरावे? त्याबाबत बँकांना सूचना द्यावी
10. शाळांसंदर्भात राज ठाकरे यांनी मोठी सूचना केली आहे. शाळा आता बंद आहेत पण शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या फीज तशाच आहेत. शाळांनी फी घेऊ नका किंवा अर्धी घ्या. एकतर मुलांचं वर्ष वाया गेलं आहे. दहावी-बारावीच्या पोरांना प्रमोट केले पाहिजे. त्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढे ढकलले पाहिजे. कारण ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील याची कल्पना नाही आहे. आपल्याही आयुष्यात असं पहिल्यांदा घडत आहे. ही मुलं तर लहान आहेत, ते कुठून अभ्यास करतील? त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रमोट केलं तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जावं. शिवाय शाळांकडे पैसे नाही आहेत. विद्यार्थ्यांचा विचार करण्याबरोबरच सरकारने शाळांचा विचारही करायला हवा