Home /News /mumbai /

शिंदे गट थांबलेल्या ताज हॉटेलमधून अटक झालेल्यांची ओळख पटली; अजित पवारांचं बंड मोडण्यातही होती प्रमुख भूमिका

शिंदे गट थांबलेल्या ताज हॉटेलमधून अटक झालेल्यांची ओळख पटली; अजित पवारांचं बंड मोडण्यातही होती प्रमुख भूमिका

काल रात्री हॉटेलमधून अटक केलेल्यांची खरी ओळख आता पटली आहे. बनावट नावं सांगून त्यांनी रूम नंबर 625 मध्ये वास्तव्य केलं होतं. बंडखोर आमदारांचं मन वळवण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी दुहा येथे आल्या असल्याची चर्चा आहे.

    पणजी 03 जुलै : शिंदे गट शनिवारी रात्री मुंबईत पोहोचला. मात्र याआधी हा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली. हे तिघे हरयाणा आणि उत्तराखंड राज्यातील असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांच्याकडे फेक आयडीकार्ड सापडले (Three arrested from Taj Hotel in Goa where Eknath Shindes group MLA stayed) होते. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यात मोठा खुलासा झाला आहे. Big News : एकनाथ शिंदेंचा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक बंडखोर आमदार राहत असलेल्या हॉटेलमध्ये बोगस ओळखपत्राद्वारे प्रवेश करून राहणाऱ्या या व्यक्ती राष्ट्रवादीच्या सोनिया दुहा आणि त्यांचा सहकारी श्रेया कोठीयाल असल्याचं समोर आलं आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. काल रात्री हॉटेलमधून अटक केलेल्यांची खरी ओळख आता पटली आहे. बनावट नावं सांगून त्यांनी रूम नंबर 625 मध्ये वास्तव्य केलं होतं. बंडखोर आमदारांचं मन वळवण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी दुहा येथे आल्या असल्याची चर्चा आहे. 419,420 अंतर्गत बोगस ओळखपत्र देणं आणि भलत्याच व्यक्तीच्या नावे हॉटेलमध्ये राहणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, 2019 मध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर आमदारांना पळवून आणण्यात सोनिया दुहा यांची प्रमुख भूमिका होती. Assembly Speaker Election : शिंदे सरकारचा आज पहिला 'पेपर', फडणवीसांच्या रणनीतीने सरकार होणार 'पास'? आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक - शिवसेनेत बंडखोरी (Shiv Sena Rebel MLAs) करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी (cm eknath shinde) झेप घेतली आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच तयारी केली आहे. त्यामुळे राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीप्रमाणे याही वेळा फडणवीस बाजी मारणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ajit pawar, Eknath Shinde

    पुढील बातम्या