मुंबई, 2 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार मुंबईसाठी रवाना झाले आहे. पुढील काही वेळात ते मुंबई विमानतळावर दाखल होतील. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आलं आहे. हे तिघे हरयाणा आणि उत्तराखंड राज्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याकडे फेक आयडीकार्ड सापडले (Three arrested from Taj Hotel in Goa where Eknath Shindes group MLA stayed) आहेत. फेक आयडीच्या माध्यमातून ते हॉटेलमध्ये रेकी करीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप पुरावा मिळू शकलेला नाही. पोलिसांकडून अटकेत असलेल्या तिघांची चौकशी केली जात आहे.
हे तिघेजण नेमकं काय पाहण्यासाठी येथे आले होते. याचाही तपास केला जात आहे. दरम्यान शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर आमदार गोव्याहून आता मुंबईच्या (Mumbai) दिशेला रवाना झाले आहेत. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील आहेत. सर्व आमदार विमानतळावर दाखल झाले.
त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. पुढील काही वेळात हे सर्व आमदार मुंबईत दाखल होतील. या आमदारांच्या विमानात बसतानाचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत आमदार विमानात आसनस्थ होताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Goa, Mla, Shivsena