Home /News /mumbai /

Assembly Speaker Election : शिंदे सरकारचा आज पहिला 'पेपर', फडणवीसांच्या रणनीतीने सरकार होणार 'पास'?

Assembly Speaker Election : शिंदे सरकारचा आज पहिला 'पेपर', फडणवीसांच्या रणनीतीने सरकार होणार 'पास'?


जर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले तर शिंदे सरकारची कायदेशीर लढाईची वाट मोकळी होणार आहे.

जर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले तर शिंदे सरकारची कायदेशीर लढाईची वाट मोकळी होणार आहे.

जर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले तर शिंदे सरकारची कायदेशीर लढाईची वाट मोकळी होणार आहे.

    मुंबई, 03 जुलै : शिवसेनेत बंडखोरी (Shiv Sena Rebel MLAs)  करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी (cm eknath shinde) झेप घेतली आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच तयारी केली आहे. त्यामुळे राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीप्रमाणे याही वेळा फडणवीस बाजी मारणार का हे पाहण्याचे ठरणार आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना मैदानात उतरवले आहे. एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार रात्रीच मुंबईत दाखल झाले आहे. सर्व आमदारांचं ताज हॉटेलवर जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी लढायची याबद्दल रणनीती ठरली आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र मिळून ही रणनीती ठरवली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून स्वतंत्र्य व्हीप बजावण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीकडूनही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेनं प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाही तो लागू  असणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेस संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेला व्हीप लागू होणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (चार्तुमासात 'या' देवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना होतील पूर्ण!) जर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले तर शिंदे सरकारची कायदेशीर लढाईची वाट मोकळी होणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री शिवसेना (Shiv Sena) आणि बंडखोर आमदारांची मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व आमदारांना संबोधन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचं स्वागत केलं. "आपण आता पुन्हा एकत्र आलो आहोत. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे", असं संबोधन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपा-सेना युतीच्या संयुक्त बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे "भाजपा-सेना वेगळी होती, असे इतके वर्ष कधी वाटले नाही. दरम्यानच्या काळात थोडे दूर गेल्यासारखे झाले. पण आता पुन्हा एकत्र आलो आहोत. मूळ परिवार एक झाला आहे. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे. आता एकत्र वाटचाल आपल्याला करायची आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव आपल्याला सर्वांना मिळून प्राप्त करून द्यायचे आहे", असं देवेंद्र फडणवीस आमदारांना उद्देशून म्हणाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मुद्दे: आज खऱ्या अर्थाने भाजपा-सेना युतीचे सरकार आले, याचे चित्र डोळ्यापुढे आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या सरकारच्या काळात वीर सावरकर यांचा अपमान, दाऊद संबंधाचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव, हे सारे अस्वस्थेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय हे पाहणे त्रासदायक होते", असं एकनाथ शिंदे म्हणाले. (दैनंदिन राशीभविष्य: कसा असेल तुमचा आजचा सुट्टीचा दिवस? वाचा सविस्तर) "नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्देवाने त्यात यश आले नाही. म्हणून आजची स्थिती निर्माण झाली. आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही. तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षाच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेतच. त्यांना कामाचा अनुभव प्रचंड आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठावूक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा मी आभारी आहे", असं शिंदे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या