वास्तुशांतीच्या महाप्रसादातून विषबाधा, 3 मुलांचा मृत्यू, 25 जणांची प्रकृती गंभीर

रायगडमधील महड येथे पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2018 09:31 AM IST

वास्तुशांतीच्या महाप्रसादातून विषबाधा, 3 मुलांचा मृत्यू, 25 जणांची प्रकृती गंभीर

रायगड, 19 जून : रायगडमधील महड येथे पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पनवेलमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे.

खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.

५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या जेवणातून विषबाधा होण्यामागचं नक्की कारण काय आहे याचा आता पोलीस तपास घेत आहेत. पण या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

हेही वाचा...

Loading...

दोघे वाचले तिसरा लाटेत गेला वाहून,थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO : ईद मुबारक हो!,तरूणीची गळाभेट घेण्यासाठी तरुणांची लागली रांग

फक्त 20 रूपयांसाठी रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव

शिवसेना शाखा प्रमुखाकडूनच नगरसेवकावर धारधार शस्त्राने हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 07:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...