गोवा, 18 जून : गोव्यातल्या सिकेरी समुद्रकिनारी अगदी जवळ लाटांचा आनंद घेत खडकावर बसलेल्या तामिळनाडूच्या तीन पर्यटकांपैकी एकाचा लाटांच्या तडाख्यात बुडून मृत्यू झालाय. तामिळनाडूच्या चार पर्यटकांचा एक गृप सिकेरीच्या बीचवर फिरण्यासाठी गेला होता. त्यातले तिघे अगदी लाटांच्या जवळ गेले होते. मात्र जोराच्या लाटेने त्यातल्या एकाचा बळी घेतलाय. तर दुसऱ्या एका गोव्यातल्याच बागा बीच जवळ झालेल्या दुर्घटनेत अशाच प्रकारे लाटांचा आनंद घेणाऱ्या मंगळूरहून आलेल्या चार पर्यटकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झालाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







