S M L

VIDEO : ईद मुबारक हो!,तरूणीची गळाभेट घेण्यासाठी तरुणांची लागली रांग

मुरादाबाद इथं एका मॉलच्या बाहेर एका तरुणीने तरुणांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. रांग लावून उभ्या असलेल्या तरुणांना शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय ठरलाय

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2018 09:34 PM IST

VIDEO : ईद मुबारक हो!,तरूणीची गळाभेट घेण्यासाठी तरुणांची लागली रांग

उत्तरप्रदेश, 18 जून : मुरादाबाद इथं मॉलच्या बाहेर एका तरुणीने  तरुणांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. रांग लावून उभ्या असलेल्या तरुणांना शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय ठरलाय. ही तरुणी कोण आहे? कुठली राहणारी आहे? याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. सांगितलं जात आहे की, हा व्हिडिओ सिव्हिल लाईन मधल्या वेव्ह सिनेमाच्या परिसरातला आहे.

रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खूप लोक पाहत आहेत. ही तरुणी ज्या ठिकाणी उभी आहे तिथे आजूबाजूला बरीच मोठी गर्दी जमा झालेली दिसत आहे आणि बरेच लोक आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत. गर्दीतील काही लोक गमंतीने कमेंट करतानाही दिसत आहेत. पण असं असूनही ही तरुणी बिनधास्तपणे तरुणांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

कुत्र्याच्या मृत्यूसाठीही मोदी जबाबदार का?, श्रीराम सेनाप्रमुखाचं वक्तव्य


वेव्ह सिनेमाच्या मॅनेजरने सांगितलं, त्यांना कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की, माॅलच्या बाहेर गर्दी जमा झाली आहे आणि एक तरुणी येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवून त्यांची गळाभेट घेत आहे. विशेष म्हणजे, या तरुणीच्या मैत्रिणी गळाभेट घेणाऱ्यासाठी रांगेत येण्याची सुचना देत आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन

या प्रकारानंतर सुरक्षारक्षकांनी तेथील गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ती तरुणी आपल्या मैत्रिणींबरोबर तेथून निघून गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 08:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close