S M L

शिवसेना शाखा प्रमुखाकडूनच नगरसेवकावर धारधार शस्त्राने हल्ला

कुर्ला कॅम्प परिसरातील सेनेचा शाखा प्रमुख जितू साळुंखे आणि गणेश पाटील यांच्या साथीदारांनी सेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर हल्ला केला आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2018 11:21 PM IST

शिवसेना शाखा प्रमुखाकडूनच नगरसेवकावर धारधार शस्त्राने हल्ला

उल्हासनगर, 18 जून : उल्हासनगर महापालिकेच्या शिवसेना नगरसेवकावर सेनेच्या शाखा प्रमुखानेच धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आलीये.

कुर्ला कॅम्प परिसरातील सेनेचा शाखा प्रमुख जितू साळुंखे आणि गणेश पाटील यांच्या साथीदारांनी सेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात नगरसेवक विकास पाटील यांच्या हाताला आणि कानाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.

रविवारी रात्री विकास पाटील हे अंबरनाथ तालुक्यातील जिआयपी धरणाच्या परिसरात एका चारचाकी गाडीतून फिरण्यासाठी आले असता वाटेत आरोपीने विकास यांच्यावर वार करून त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात ते जखमी झाले.

दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेश पाटील आणि शाखा प्रमुख जितू साळुंखे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र आपल्याला जीवे ठार मारण्याचा प्रयन्त होता असा आरोप विकास यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 11:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close