मुंबई, 11 मे: राज्यात कोरोनाचा (Maharashtra corona cases) संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन (Maharashtra lockdown) लावण्यात आला आहे. 15 मेनंतर आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. याबद्दल बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली तसंच लॉकडाऊनबद्दलही भाष्य केले आहे.
'बुधवारी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लॅाकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. लॅाकडाऊन संदर्भात ज्या अटी आहेत, त्या लगेच कमी केल्या जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात योग्य तो निर्णय घेणार आहेत, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
डॉक्टरांनी कोरोना रुग्ण वृद्धाला मृत घोषित केलं, दीड तास मुलीने फोडला टाहो अन्..
तसंच, 'राज्यात 1 कोटी 84 लाख लसीकरण झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली ३ लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहे', असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
'वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यांना दुसरा लशीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून 18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा हा 45 वरील वयोगट यासाठी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असंही टोपे यांनी स्पष्ट केले.
नेमकं घडतंय काय! वर्षभरापासून फ्रिजरमध्ये स्टोर आहेत 750 कोरोना रुग्णांचे मृतदेह
'म्युकोरमायकोसिस बाबत काही जिल्ह्यात हे रूग्ण आढळत आहेत. सरकारी रूग्णालयात माहत्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार मोफत केले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असंही टोपेंनी जाहीर केलं.
'रेमडेसीवीर इंजेक्शन ग्लोबल टेंडर काढले जाणार आहे. ६ कंपन्या यासाठी इच्छुकता दाखवली आहे. साधरण प्रत्येक कंपनी किमान ५० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देईल', असंही टोपेंनी सांगितले.
'व्हॅक्सिनबाबत ग्लोबल टेंडर काढणे कठीण आहे. कारण त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी गरजेची आहे. केंद्र सरकारला याबद्दल विनंती केली आहे की व्हॅक्सिनसाठी परवानगी द्यावी', असंही टोपेंनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.