मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बॉलिवूडभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा, भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी सोडली मुंबई

बॉलिवूडभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा, भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी सोडली मुंबई

प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे (Hrithik Roshan) कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेल्याचे सांगण्यात येत आहे. हृतिक रोशनचे मुंबई शहरापासून दूर खंडाळ्यामध्ये स्वत:चा एक आलिशान फार्म हाऊस आहे.

प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे (Hrithik Roshan) कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेल्याचे सांगण्यात येत आहे. हृतिक रोशनचे मुंबई शहरापासून दूर खंडाळ्यामध्ये स्वत:चा एक आलिशान फार्म हाऊस आहे.

प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे (Hrithik Roshan) कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेल्याचे सांगण्यात येत आहे. हृतिक रोशनचे मुंबई शहरापासून दूर खंडाळ्यामध्ये स्वत:चा एक आलिशान फार्म हाऊस आहे.

मुंबई, 11 मे: मुंबईत कोरोना विषाणूचा (Coronavirus in Mumbai) कहर काहीसा कमी झाला असला तरी मृतांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही. अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना बेड, रुग्णालये आणि ऑक्सिजन या सर्व गोष्टींची कमतरता भासत आहे. अशा काळात सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड मंडळींपर्यंत ज्यांची इतर ठिकाणी राहण्याची सोय आहे, असे अनेकजण मुंबई सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर होत आहेत. प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे (Hrithik Roshan) कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेल्याची माहिती समोर आली आहे. हृतिक रोशनचे मुंबई शहरापासून दूर खंडाळ्यामध्ये स्वत:चा एक आलिशान फार्म हाऊस आहे.

हृतिक रोशनच्या कुटुंबातील सदस्य फार्महाऊसमध्ये राहायला गेले असले तरी सध्या हृतिक रोशन मात्र जुहूमधील त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहे. हृतिकचे कुटुंब काही आवश्यक वस्तू घेऊन फार्महाऊसमध्ये राहायला गेले आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन हे फक्त मुंबईत महत्त्वाची बैठक किंवा इतर कोणते महत्त्वाचे काम असल्यासच येतात, असे सांगण्यात येत आहे.

हे वाचा - जन्मताच होती त्याची कोरोनाशी लढाई, 11 दिवसांनी नवजात बाळानं COVID-19 वर केली मात

कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने सावधगिरी म्हणून राकेश रोशन यांनी मुंबई बाहेर जावून राहण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. बॉलिवूडमध्येही अनेकांना कोरोनाचा लागण झाल्याची बरीच प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. या बिकट काळात त्यांनी खंडाळ्यामध्ये बांधलेल्या हृतिकच्या अलिशान फार्महाऊसमध्ये जावून राहणे पसंत केले आहे.

हे वाचा - ‘हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतिक’, अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसची टीका

नुकतेच राकेश रोशन (Rakesh Roshan) आणि पिंकी रोशन (Pinkie Roshan) यांनी त्यांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी राकेश आणि पिंकीने वधू-वरांसारखे कपडे घातले होते. पिंकी यांनी मेंहदीही लावली होती आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. राकेश रोशन आणि पिंकी रोशन एकमेकांवर खूप प्रेम करतात. आयुष्यात अनेक चढ-उतार आले, परंतु त्यांनी प्रत्येक प्रसंगला हसत-खेळत तोंड दिले. व्हिडिओ आणि फोटो शेअर करून आपल्या जीवनाचा हा सुंदर प्रवास शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर पिंकी रोशनने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये लिहिले होते 'दुल्हा आया गया'.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Corona updates, Hritik Roshan