Home /News /mumbai /

विधान परिषदेवरून महाविकासआघाडीत नवा पेच, सेना-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार?

विधान परिषदेवरून महाविकासआघाडीत नवा पेच, सेना-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार?

महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याचे काम सुरू केल्याचं समोर आलं आहे.

मुंबई, 06 मे : महाराष्ट्रावर कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार म्हणून निवडून येण्याचे आव्हान आहे. यावर तोडगा म्हणून  विधान परिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा महाविकासआघाडीचे आहे. परंतु, काँग्रेसने केलेल्या मागणीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. विधान परिषदेच्या 9  जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. रिक्त झालेल्या 9 जागांपैकी सत्ताधारी शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि काँग्रेस 1 आणि भाजप 4 असे उमेदवारांचे  समीकरण ठरल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर  दबाव वाढवण्याचे काम सुरू केल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीत विधान परिषद सहावा उमेदवार द्यावा यासाठी काँग्रेस आग्रहामुळे शिवसेना- राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. हेही वाचा - उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या इम्तियाज जलील यांना भाजप नेत्याचं प्रत्युतर याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात  मंगळवारी रात्री बैठक झाली. परंतु,  विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडून जास्तीची जागा लढायची की नाही, याबाबत तोडगा अजून निघालेला नाही. राष्ट्रवाजी पक्षाला राज्यसभेसाठी फौजिया खान, तर आता विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडे मतांचा आकडा नसतानाही एक जागा जास्त लढवत आहे, हा मुद्दा काँग्रेसनं बैठकीत उपस्थितीत केला. त्यामुळे  दोन जागा लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती समोर आली. काँग्रेसचे राज्यातील नेते राज्यात दोन जागांवर लढावे, यासाठी दिल्ली हायकमांडकडे आग्रह करून आहे. हेही वाचा -लॉकडाऊनमधील आर्थिक चणचण जीवघेणी; रिक्षाचालकाने स्वत:च्याच गळ्यावर फिरवला सुरा त्यामुळे काँग्रेस पक्षाची आग्रहाच्या मागणीवर तोडगा काढण्याची जबाबदारी आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर येऊन ठेपली आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवारांची जास्तीची मतं वळवत दुसरा उमेदवार निवडणूक येण्यासाठी सहकार्य करावे, अशी काँग्रेसची मागणी आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस पक्षाने दुसरा उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचे सहावा उमेदवार राहील, दुसरीकडे भाजपने चार उमेदवार दिले तर 9 जागासांठी 10 उमेदवार राहिल्यावर विधान परिषद बिनविरोध होणे कठीण होऊन जाईल. विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना जास्त आग्रही आहे. कारण कोरोना संकट, निवडणूक मतदान गोपनीय असल्याने मत फुटणार नाही. याची खबरदारी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. नेमकी तीच डोकेदुखी होईल. त्यामुळे बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी  शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत? तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या इच्छुकांची नाव चर्चेत आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून मोहन जोशी, माणिकराव ठाकरे , नसिम खान, मुजप्फर हुसेन यांची नाव चर्चेत आहेत. राष्ट्रवादीत सु्प्रिया सुळे या त्यांच्या निकटवर्तीय रूपाली चाकणकर, आदिती नलावडे यांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील तर अजित पवार हे अमोल मिटकरी, नजीम मुल्ला यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेकडून दोन नाव निश्चित तर, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरू झाली आहे. शिवसेनेकडून उद्धव  ठाकरे आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांची नावं विधान परिषदेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा -गोल्डमॅनचं निधन, साडेआठ किलो सोन्यासह दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत मुंबई, ठाणे, रायगड या मतदार संघातील शिवसेनेच्या आमदारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या करण्यात आल्या असल्याचं कळतंय. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Balasaheb thorat, BJP, Chandrakant patil, Congress, Sanjay raut, Shivsena, Uddhav Thackery

पुढील बातम्या