जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या इम्तियाज जलील यांना भाजप नेत्याचं रोखठोक प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या इम्तियाज जलील यांना भाजप नेत्याचं रोखठोक प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या इम्तियाज जलील यांना भाजप नेत्याचं रोखठोक प्रत्युत्तर!

दारूविक्री करण्याची आणि माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही,’ असं ट्वीट करत इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 6 मे: मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरानंतर औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रेड झोन असलेल्या औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या 300 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 10 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. एकीकडे ही स्थिती असताना अर्थव्यवस्था पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारकडून हॉटस्पॉट नसलेल्या भागात मद्यविक्रीचा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. हेही वाचा.. गोल्डमॅनचं निधन, साडेआठ किलो सोन्यासह दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत

जाहिरात
जाहिरात

औरंगाबादमधील दारूचे दुकाने उघडल्यास आम्ही सर्व लॉकडाऊनचे निर्बंध तोडू आणि सक्तीने ही दुकाने बंद करू. महिलांना घेवून रस्त्यावर उतरू. दारूविक्री करण्याची आणि माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही,’ असं ट्वीट करत इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. ‘उद्धवजीच्या कामाची आम्हीही तारीफ करत होतो. पण आता सगळं वाया गेलं, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं., यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लॉकडाऊनचे नियम तोडण्याची भाषा खासदाराला शोभते का, असा सवालही डॉ.कराड यांनी केला आहे. चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्या खासदारावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लॉकडाऊनचे नियम मोडून महिलांना रस्त्यावर उतरवू असे म्हणणे, म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं खासदार भागवत कराड यांनी म्हटलं आहे. हेही वाचा.. नंतर प्रशासनाने घेतली ही भूमिका.. औरंगाबादमधील कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेत प्रशासनाने शहरात मद्यविक्री करण्यास मनाई केली आहे. औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने प्रशासन जोखीम घेण्यास तयार नाही. त्यामुळे औरंगाबादेत मद्यप्रेमींना अजून काही दिवस कळ सोसावी लागणार, असंच चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात