मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आगामी BMC निवडणुकीत शिवसेना देणार काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टक्कर, संजय राऊतांनी दिली माहिती

आगामी BMC निवडणुकीत शिवसेना देणार काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टक्कर, संजय राऊतांनी दिली माहिती

शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सर्वांत मोठा खुलासा केला आहे.

शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सर्वांत मोठा खुलासा केला आहे.

शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सर्वांत मोठा खुलासा केला आहे.

    मुंबई, 09 ऑक्टोबर: शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सर्वांत मोठा खुलासा केला आहे. संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुंबई महापालिका (BMC Election) निवडणूक शिवसेना (Shivsena) स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी 100 पेक्षा अधिक जागांवर लढण्यासाठी आम्ही तयारी करत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा मुंबईत विस्तार व्हावा याकरिता पक्षाची भूमिका कायम आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढणार आहे. मागील पालिका निवडणूक ही पक्षानं ताकदीवर लढल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकमत डॉट कॉमनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. हेही वाचा- Video: कोरोना नियमांचा फज्जा! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण दोन दिवसांपूर्वीच राज्यात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवरच आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भूमिकाबाबत संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका सांगितली. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे राज्य नसेल तर कुणाचे राज्य असेल. तर मुंबई पालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. दसरा मेळाव्याबाबत काय बोलले राऊत दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईन पद्धतीनं शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र, यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू आहे. आणि याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Dasara Melava) यांनी दिली. हेही वाचा- IPL 2021, DC vs RCB: भरतनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटचा जोरदार जल्लोष! पाहा VIDEO शिवसेनेचा दसरा मेळावा हा यंदा कोरोनाचे नियम पाळून होणार आहे. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. मात्र, यावेळी हा मेळावा जाहीर होणार आहे. अशी माहिती देखील राऊत यांनी यावेळी दिली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BMC, Election, Sanjay Raut (Politician), Shivsena

    पुढील बातम्या