पोलीस स्टेशन जवळ सेलिब्रेशन ही घटना घडली आहे सूरतमध्ये. जेथे नाईट कर्फ्यूचे आणि पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेचं उल्लंघन करण्यात आलं आहे. भागातलाव जनता मार्केटमध्ये काही लोकांनीबर्थडे पार्टीसाठी एका डान्सरला बोलावलं होतं. तसंच या पार्टीत पैसे उडवल्याचं दिसलं. ही बर्थडे पार्टी अठवा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर सुरु होती. ज्यात कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आलेला दिसून आला. या बर्थडे पार्टीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवरही लोकं प्रश्न उपस्थित करत आहेत. पोलिसांनी काय केली कारवाई या बर्थडे पार्टीचा व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओचा तपास सुरु करुन कारवाई करण्यास सुरुवात केली. तपासा दरम्यान असं समोर आलं की, हा व्हिडिओ 5 दिवसांपूर्वीचा आहे. ज्यामध्ये नानपुरा खंडेरापुरा येथील रहिवासी उहैद शेख आपल्या एक वर्षाच्या मुलीचा बर्थडे साजरा करत आहे. या पार्टीमध्ये एक मोठा स्टेज उभारण्यात आला होता, ज्यावर एका प्रोफेशनल डान्सरला डान्स करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. या व्हिडिओमध्ये सुकरी आणि मिंडी गँगचे सदस्यही दिसत आहेत. याशिवाय रुस्तमपुराचा प्रसिद्ध जाफर गोल्डन देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांकडून 7 जणांना अटक पोलिसांनी तपास करुन व्हिडिओचे लोकेशन शोधून काढलं आणि त्यात दिसणाऱ्या लोकांचा शोध घेतलाय. त्यानंतर पोलिसांनी नानपुरा खंडेरापुरा येथील रहिवासी, उहैद शेख, कैझर शेख, फवाद शेख, उवैश कुंभार, तुफैल कुंभार, मोहम्मद ईशा शेख आणि अनस फकीर अंग्रेज यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांवर कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर आरोपी, डान्सर आणि डीजेची चौकशी सुरू आहे. लवकरच पोलीस त्यांच्यावरही काही कारवाई करण्याची शक्यता आहे.સુરતમાં બાર ડાન્સરોના જાહેરમાં ઠુંમકા, વીડિયો વાયરલ pic.twitter.com/kzjjMVCfTY
— News18Gujarati (@News18Guj) October 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Surat