मुंबई, 9 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शुक्रवारी रंगतदार मॅच झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अगदी शेवटच्या बॉलवर दिल्ली कॅपिटल्सचा (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) पराभव केला. आरसीबीच्या केएस भरतनं (KS Bharat) शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत बंगळुरूला हा विजय मिळवून दिला. आरसीबीला मिळालेल्या या थरारक विजयानं कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच आनंदी झाला होता. विराटनं ड्रेसिंग रुममध्ये विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केले. भरतनं आवेश खानच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटनं जागेवरच उडी मारली. तसंच टीममधील सहकाऱ्यांची गळाभेट घेऊन आनंद साजरा केला. विराटच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे. दिल्लीनं दिलेल्या 165 रनचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. त्यांची अवस्था 2 आऊट 6 अशी झाली होती. विराट कोहली (4) आणि देवदत्त पडिक्कल (0) रन काढून आऊट झाले. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या आरसीबीला केएस भरतनं सावरलं. त्यानं सुरूवातीला एबी डिविलियर्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी 49 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलसोबत चौथ्या विकेटसाठी 111 रनची पार्टनरशिप करत आरसीबीला विजय मिळवून दिला. भरतनं 52 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली.
Scenes from the #RCB camp as @KonaBharat finishes it off in style.#VIVOIPL #RCBvDC pic.twitter.com/ApyHdTuJ9U
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
भरतनं 78 रनच्या या खेळीत 3 फोर आणि 4 सिक्स लगावले. ही त्याची टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीसाठी त्याची ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. भरतला मॅक्सवेलनं भक्कम साथ दिली. त्यानं नाबाद 51 रन काढले. या विजयानंतरही आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवर राहिली. चेन्नई सुपर किंग्सनं दुसरा तर दिल्ली कॅपिटल्सनं पहिला क्रमांक पटकावला. POINTS TABLE: त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 164 रन केले. दिल्लीकडून पृथ्वी शॉनं सर्वात जास्त 48 रन केले. तर शिखर धवननं 43 रन काढले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि डॅन ख्रिस्टीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

)







