सोलापूर 28 जून : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला आहे (Maharashtra Political Crisis). आठवडाभरापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 40 आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. आपल्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकारमध्ये राहायचं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून हे सरकार वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. अशात आता भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठं विधान केलं आहे.
माजी आमदारांनाही लागले झाडी..डोंगराचे वेध, शिंदे गटाला दिला पाठिंबा, सेनेला धक्का
भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी असा दावा केला आहे, की येत्या दोन तीन दिवसांत राज्यात भाजपचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. पुढे ते म्हणाले की आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा फडणवीसच करतील. फक्त आमदाराचं नाही तर शिवसेनेचे 10 ते 12 खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील, असंही चिखलीकर म्हणाले.
यासोबतच संजय राऊत यांच्या काही वक्तव्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं बंडखोर आमदारांनी म्हटलं होतं. यानंतर केंद्राने त्यांना आणि कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. याबाबतही चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिंदे गट बहुमत चाचणीची मागणी करेल का? सत्तासंघर्षात तुम्हाला पडलेल्या पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
याआधीही चिखलीकर यांनी असा दावा केला होता की राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात दाखल होतील. या दाव्यामुळे आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.