मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माजी आमदारांनाही लागले झाडी..डोंगराचे वेध, शिंदे गटाला दिला पाठिंबा, सेनेला धक्का

माजी आमदारांनाही लागले झाडी..डोंगराचे वेध, शिंदे गटाला दिला पाठिंबा, सेनेला धक्का

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहे.

 

पंढरपूर, 28 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर (mva government) अस्थिरतेचे संकट उभे ठाकले आहे. एक एक करून आमदार शिंदे गटात सामील होत आहे. आता सोलापुरात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (naryan pati) शिंदे गटात सामील झाले असून पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्रामध्ये अभुतपूर्व असा सत्तासंघर्ष नाट्य सुरू आहे. एकनाथ शिंदे 39 आमदारांसह गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. शिंदे गटाने आणखी आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडानंतर नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. 2014 मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढविली होती. त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. तेव्हापासून नारायण पाटील शिंदे हे शिवसेनेवर नाराज होते. शिवसेना आमदारांच्या बंडानंतर नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर (SC on Maharashtra rebel MLA) आता ते बहुमत चाचणीची मागणी करण्यासाठी राज्यपालांकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत या बंडखोर आमदारांचं निलंबन करता येणार नाही असा निर्वाळा (SC on disqualification of Rebel MLA) दिल्यामुळे, तोपर्यंत बहुमत चाचणीची (Floor Test) मागणी करण्याचा हक्क त्यांना आहे. यामुळे शिंदे गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. घटनात्मक दृष्टीने हे शक्य आहे का याची चाचपणी ते सध्या करत आहेत. यादरम्यान भारतीय जनता पक्षदेखील सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची (No-Confidence Motion) मागणी करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे जुलैच्या मध्यात सुरू होणार आहे.

,

First published:
top videos