पुणे, 14 जून : कोकण, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानंतर आज मुंबई पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं रविवारी मुंबई-ठाण्यासह उपनगर, पालघर आणि पुण्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला. ठाण्यासह उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे. कोकणातील काही भागांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. वैभववाडी तालुक्यात शनिवारी 225 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 14 ते 16 जूनपर्यंत मुसळधार पाऊस होईल असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर जाणार होते मात्र मुसळधार पावसाचा इशारा असल्यानं त्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.
Maharashtra: Water logging inside Nashik Road Police Station following heavy rainfall in the city. pic.twitter.com/YIqhYRc3J4
— ANI (@ANI) June 13, 2020
हे वाचा- मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी चालतं-फिरतं बुक हाऊस; गरजुंना तुम्हीही करू शकता मदत दुसरीकडे नाशिकमध्ये पवासानं रात्री जोर धरल्यानं सखल भागांमध्ये पाणी साचले. नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर पहिल्याच मुसळधार पावसात अनेक घर आणि पोलीस पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. राज्यात मान्सून दाखल झाल्यानं अनेक भागांमध्ये भातशेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा मान्सून चांगला होईल असा अंदाजही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मान्सूनचा दक्षिणेकडून पश्चिमेकडे प्रवास सुरू आहे. मान्सूनचा आतापर्यंत रत्नागिरीतील हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया येथेपर्यंत प्रवास झाला आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील सर्व भागात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत साधारण 9-10 जूनला मान्सून दाखल होत असतो. यंदा मात्र, मान्सूनला मुंबईत पोहोचण्यास 3-4 दिवस विलंब झाला आहे. हे वाचा- लॉकडाऊनमध्ये पुण्यात तान्ह्या बाळाचा जीवनसंघर्ष, अशी जगतंय फाटलेल्या आभाळाखाली! हे वाचा- मुंबईत टोयटा फॉर्चूनर कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, अपघाताचे भीषण PHOTOS संपादन- क्रांती कानेटकर