मुंबई, 20 फेब्रुवारी: युपीएससीमार्फत निवड होणाऱ्या केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे.
अल्पसंख्याक आयोगामार्फत सध्या 5 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेली 'स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना' आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास विभागाला याबात सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशिक्षण योजनेतून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन 2 हजार रुपयांवरुन 4 हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संबंधीत प्रशिक्षण संस्थांना दिल्या जात असलेल्या निधीची रक्कमही 50 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अल्पसंख्याक विकास विभागाला तशा सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री मलिक यांनी दिली.
'नाणार'वरून शिवसेनेत दुफळी, 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
अल्पसंख्याक समाजाचे शासकीय नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व वाढावे यासाठी अल्पसंख्याक आयोगामार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी 'स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना' राबविली जाते. राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील केंद्रे तसेच पुण्यातील 'यशदा'मधील केंद्रामध्ये निवडक होतकरु अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या योजनेतून प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आता या योजनेची व्याप्ती राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही वाढविण्याच्या अनुषंगाने योजना तयारी करावी अशा सूचना अल्पसंख्याक विकास विभागाला देण्यात आल्या आहेत, असे मलिक यांनी सांगितले.
15 कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?
सध्या राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील केंद्रे तसेच पुण्यातील 'यशदा'मधील केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन 2 हजार रुपयांवरुन 4 हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सोय उपलब्ध नसल्याने त्यांच्या विद्यावेतनात वाढ करावी, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाकडून करण्यात आली होती. याशिवाय या प्रशिक्षण संस्थांना दिल्या जात असलेल्या निधीची रक्कमही ५० हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंबाबतच्या 'त्या' बातमीवर संजय राऊतांचे शिक्कामोर्तब!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra news, Navab malik, Upsc, Upsc exam