उद्धव ठाकरेंबाबतच्या 'त्या' बातमीवर संजय राऊतांचे शिक्कामोर्तब!

उद्धव ठाकरेंबाबतच्या 'त्या' बातमीवर संजय राऊतांचे शिक्कामोर्तब!

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. या चर्चेवर अखेर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे.

'होय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे हे उद्या दिल्ली येथे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही. जय महाराष्ट्र,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे मोदी-उद्धव ठाकरे भेटीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र 25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलंय त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल, राज ठाकरे यांच्या मनसेचा MIM ला इशारा

ठाकरे सरकारला आता तीन महिने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत. या भेटीत ते आणखी कुणाला भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. उद्धव ठाकरे यांनीही एका पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध झुगारत उद्धव ठाकरे यांनी राज्यात CAA आणि NPR लागू करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

First published: February 20, 2020, 7:55 PM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या