जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 15 कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?

15 कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?

15 कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?

कर्नाटकातल्या गुलबर्गा येथील जाहीर सभेत भाषण करताना वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधानं केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर,20 फेब्रुवारी:‘इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, अशी चिथावणीखोर भाषा वापरत एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केले. दोन समाजात तेढ निर्माण करू शकतील, अशी धक्कादायक विधानही वारिस पठाण यांनी आपल्या भाषणात केली आहे. यावरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी वारीस पठाण यांना चांगलेच फटकारले आहे. ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला गुरुवारी पाच वर्षे पूर्ण झालीत. त्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जावेद अख्तर बोलत होते. देशातल्या 36 विद्यापीठांमध्ये सध्या खदखद सुरू आहे. भाजप ही एक शाखा असून मुख्य पक्ष आरएसएस आहे आणि स्वातंत्र्यपूर्वकाळात मुस्लिम लीग आणि आरएसएस हे इंग्रजांचे एजंट होते, असा घणाघात जावेद अख्तर यांनी केला. तर ‘वारिस पठाण तू कुणाकडे नोकरी करतोस? तुम्ही 15 कोटींच राहणार. 15 कोटीचा ठेका तुला कुणी दिला? अशा शब्दात जावेद अख्तर यांनी वारीस पठाण यांना फटकारले आहे. पाकिस्तान तयार होऊन जिना यांची इच्छा पूर्ण झाली. पण जिना यांची विचारसरणी आजही देशात आहे. गुलबर्गाच्या सभेत काय म्हणाले वारिस पठाण? कर्नाटकातल्या गुलबर्गा येथील जाहीर सभेत भाषण करताना वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधानं केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वारिस पठाण हे एमआयएमचे माजी आमदार आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदारसंघातून ते गेल्या विधानसभेत निवडून आले होते. CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले, “ते म्हणतात आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!”, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली. समोर उपस्थित समुदायाला उद्देशून ते म्हणाले,“आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!” वारिस पठाण यांच्या वादग्रस्त भाषणावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीने बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अशी भाषा या वेळी करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. हे अयोग्य आहे. आम्ही पराक्रमी आहोत, असं दाखवायचा हा प्रयत्न असेल तर तो अकारण आहे. कारण नसताना त्यांनी 100 कोटी लोकांचा अवमान करत त्यांना चिथावणी द्यायचं काम केलं आहे. 100 कोटी सहिष्णू आहेत म्हणून. पण वारिस पठाण म्हणतात तसं सगळ्यांनी हिसकावून घ्यायची भाषा केली तर काय होईल?”

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात