मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

स्थानिक निवडणुका 'या' महिन्यात? शरद पवारांनी दिले कामाला लागण्याचे आदेश!

स्थानिक निवडणुका 'या' महिन्यात? शरद पवारांनी दिले कामाला लागण्याचे आदेश!

 मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मुंबई, 31 ऑगस्ट : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका (Local body elections)  लांबणीवर पडल्या होत्या. पण, आता फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्याच अनुषांगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सर्व नेते, मंत्री आणि आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे.

आज मुंबईमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जवळपास 3 तासांहुन अधिक काळही बैठक पार पडली.

लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.  डिसेंबरमध्ये 10 पालिकांची मुदत संपणार आहे तर 100 नगरपालिकांची मुदत संपत आहे. या दरम्यान कोविडची परिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सर्वच्या स्थानिक निवडणुका या फेब्रुवारीमध्ये होतील हे निश्चित झाले आहे.

सावधान! तुम्ही औषध म्हणून घेत असलेलं टॉनिक विष तर नाही ना? पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे, एका प्रकारेही मिनी विधानसभेची निवडणूक समजली जाणार आहे.  त्यामुळे शरद पवार यांनी सर्व नेते आणि मंत्र्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे.

'त्याच्याशिवाय जगणं मुश्किल', सर्वात प्रिय व्यक्ती दूर गेल्याने मलायका भावुक

दरम्यान, 'आजच्या बैठकी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. संपर्क मंत्र्यांच्या जबाबदारी वाढवण्यात आल्या आहे.  त्या जिल्ह्यातील परिस्थिती कशी यावर चर्चा करण्यात आली आहे. तसंच, स्थानिक स्वराज्य संस्था फेब्रुवारीमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

तसंच, सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा अद्याम महामंडळाचा मुद्दा मार्गी लागला नाही. त्यामुळे महामंडळ नेमणूक बाबत नाव घेण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत नाव जाहीर करणार असल्याचही मलिक यांनी सांगितलं.

First published:

Tags: NCP, Sharad pawar