जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सावधान! तुम्ही औषध म्हणून घेत असलेलं टॉनिक विष तर नाही ना? कारखान्यावर पोलिसांनी टाकली धाड

सावधान! तुम्ही औषध म्हणून घेत असलेलं टॉनिक विष तर नाही ना? कारखान्यावर पोलिसांनी टाकली धाड

सावधान! तुम्ही औषध म्हणून घेत असलेलं टॉनिक विष तर नाही ना? कारखान्यावर पोलिसांनी टाकली धाड

आपण घेतलेलं औषध नक्की चांगलं आहे का? हे ओळखणं सोपी नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

कानपुर (उत्तर प्रदेश), 31ऑगस्ट: खोकला असो की इतर कोणते आजार डॉक्टर नेहमीच आपल्याला औषध (Tonics) देतात. अनेकदा हे औषध सिरप (Syrup) किंवा टॉनिकच्या स्वरूपात असतं. आपण बाजारातुन हे औषध आणतो आणि दररोज घेतो. मात्र आपण घेतलेलं औषध नक्की चांगलं आहे का? हे ओळखणं सोपी नाही. म्हणूनच अशा काही नकली औषध (Fake cough syrup) बनवणाऱ्या कंपन्या काळे धंदे करतात. असाच एक कारखाना उत्तर प्रदेशातील कानपुर इथे पोलिसांना सापडला (UP police raid on fake cough syrup factory) आहे. शुक्लगंजमध्ये पोलिसांनी शहरातील शक्ती नगरमध्ये छापा टाकून (Crime News) ब्रँडेड कंपन्यांच्या नावावर बनावट खोकल्याचं टॉनिक तयार करणाऱ्या कारखान्याचा भंडाफोड केला. तीन आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट सरबत, कच्चा माल, विविध कंपन्यांचे रॅपर आणि पॅकिंग मशीन जप्त केली. या संबंधीचं वृत्त ‘अमर उजाला’नं दिलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा, बनावट औषधांची खेप घेऊन जाणारी कार मर्‍हाळा चौकाकडे येत असल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी घेराव घालून कार थांबवली तेव्हा त्यात कफ सिरपच्या शेकडो कुपी सापडल्या. चौकशी दरम्यान सोनू तिवारी, शक्ती नगरचे रहिवासी, अजय बाजपेयी आणि ब्राह्मणनगरचे रहिवासी गौरव सिंह यांनी बनावट खोकल्याचं टॉनिक बनवतो अशी कबुली दिली. हे वाचा - प्रेमाचा झांगडगुत्ता: पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची गर्लफ्रेंड आले आमनेसामने पोलिसांनी जेव्हा कारखान्यावर छापा टाकला तेव्हा ब्राह्मणनगर येथील रहिवासी विकास गुप्ता आणि इंदिरानगर येथील रहिवासी फैज, जे तेथे काम करत होते, ते फरार झाले. तपासादरम्यान, कारखान्यात पॅकिंग मशीन, ब्रँडेड कंपनीची औषधानं भरलेली 1540 कुपी जप्त करण्यात आल्यात. फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तसंच या टॉनिक नक्की कोणत्या ठिकाणी पाठवण्यात येत होत्या याचाही शोध पोलीस घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात