मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'त्याच्याशिवाय जगणं मुश्किल', सर्वात प्रिय व्यक्ती दूर गेल्याने मलायका अरोरा भावुक

'त्याच्याशिवाय जगणं मुश्किल', सर्वात प्रिय व्यक्ती दूर गेल्याने मलायका अरोरा भावुक

अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई, 31 ऑगस्ट : आपल्या मुलांना लहानाचं मोठं करणं हा अविस्मरणीय अनुभव असतो. हा एक प्रवास असतो आणि तो संपूच नये, असंच प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं; पण मुलं मोठी झाली, की आपसूकच स्वतःच्या पंखांच्या बळावर झेप घेतात, त्यांचं स्वतःचं असं वेगळं विश्व तयार होतं. मुलाचं असं वेगळं विश्व तयार होणं हे आई-वडिलांना हवंहवंसंही वाटत असतं, पण इतकी वर्षं आपण वाढवलेलं मूल आपल्यापासून दूर जाणार म्हणून त्यांना थोडा त्रासही होत असतो. सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वात ही बाब खूप मोठा बदल घडवून आणते. सेलेब्रिटीही याला अपवाद नाहीत. आपले बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज, तसंच फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या मलायका अरोराने (Malaika Arora) अलीकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टवरून याचा अंदाज येतो.

मलायका अरोरा आणि अरबाझ खान (Arbaaz Khan) यांचा मुलगा अरहान खान आता 18 वर्षांचा झाला असून, तो पुढच्या शिक्षणासाठी अलीकडेच परदेशात रवाना झाला. मलायका आणि अरबाझ यांचा घटस्फोट झाल्यानंतर अरहान (Arhaan Khan) आईसोबतच राहत होता. तो परदेशात जाण्यापूर्वी मलायकाने एक आई म्हणून आपल्या काळजात कशी कालवाकालव होत आहे, याबद्दलच्या भावना इन्स्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या होत्या.

हे वाचा - हृतिक, कतरिनाला घेऊन केलेल्या Zomato च्या जाहिरातीवर टीकेचा भडीमार: अखेर...

मलायकाचा मुलगा अरहान अलीकडेच परदेशात उच्च शिक्षणासाठी रवाना झाला. त्यापूर्वी मलायका, अरबाझसह अनेक जवळच्या कुटुंबीयांसह अरहान फॅमिली लंचसाठी गेला होता. त्या वेळचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अलीकडेच एका इंटरव्ह्यूमध्ये मलायकाने आपल्या मुलाच्या विरहाबद्दल सांगितलं होतं. 'अरहानशिवाय राहणं कठीण आहे. मी आता अरहान आजूबाजूला नसताना जगण्याचा प्रयत्न करत आहे; पण खरं सांगायचं तर मला त्या गोष्टीची कधी सवय होईल असं वाटत नाही,' असं ती म्हणाली होती.

त्याआधी काही दिवसांपूर्वी मलायकाने इन्स्टाग्रामवर मुलगा अरहानसह एक फोटो शेअर केला होता. त्यात ती आणि अरहान बाथरोब परिधान करून खिडकीजवळ उभं राहून बाहेरच्या बाजूला पाहत होते. 'आपण जेव्हा नवा आणि अनोळखी प्रवास सुरू करतो, तेव्हा आपल्याला भयही वाटत असतं आणि उत्सुकताही असते, नवे अनुभव मिळत असतात. अरहान, मला तुझा अभिमान आहे. ही तुझा झेप घेण्याची वेळ आहे. खूप उंच आकाशात भरारी मार, स्वतःची सगळं स्वप्नं पूर्ण कर,' अशी कॅप्शन मलायकाने त्या फोटोसोबत लिहिली होती.

हे वाचा - 'इमली'च्या चाहत्यांना मोठा धक्का; 'या' मुख्य कलाकाराची मालिकेतून एक्झिट

'अरहानला गुडबाय म्हणणं सर्वांत कठीण आहे,' असंही तिने एका स्टोरीमध्ये लिहिलं होतं. त्यामुळे 'आईचं हृदय ते आईचं हृदय, मग ती आई सेलेब्रिटी का असेना,' अशी भावना नेटिझन्सकडून व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Entertainment, Malaika arora