मुंबई, 23 जून : मुंबईकडून पुण्याकडे जाताना खंडाळा घाटात अचानक दरड कोसळली आहे. त्यामुळे एका ट्रेलरचे मोठं नुकसान झालं आहे. काल रात्री पासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ही दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येत आहे.
पण दरम्यान रत्यामध्ये दरड कोसळ्याने वाहतूक बऱ्याच वेळ ठप्प झाली आहे. तर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी तिसऱ्या लेनला ब्लॉक करून 2 लेन सुरू ठेवल्या आहेत. काही काळा करिता वाहतूक बंददेखील आली होती.
दरम्यान, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण या सगळ्यात गंभीर म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर या डोंगरांना कोणत्याही जाळ्या लावण्यात आल्या नव्हता. त्यामुळे दगडं थेट ट्रेलरवर कोसळली आणि ट्रेलरचं मोठ नुकसान झालं आहे.