जम्मू काश्मीर, 23 जून : काश्मीरच्या खोऱ्यात तैनात सुरक्षादलांसाठी दहशतवाद्यांकडून केलेल्या दगडफेकीमुळे आता नवीन समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. दगडफेकीच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी रोज त्यांना नवीन रणनीती आखावी लागते आणि त्यात ते यशस्वीही होतात, पण आता दहशतवाद्यांकडून दगडांच्या नावाखाली ग्रेनेड फेकले जात आहेत. त्यामुळे सुरक्षादलंच आता सुरक्षित नाही आहेत. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या या ग्रेनेड हल्ल्यामुळे ही सुरक्षादलं पुरती वैतागून गेली आहेत. शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात प्रथमच दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 10 सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. ‘काश्मीरच्या जनतेला हवं स्वातंत्र्य’ ते झालं असं की, नेहमीप्रमाणे खोऱ्यात तैनात असलेल्या जवानांची कामं सुरू होती आणि अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. सीआरपीएफ जवानंही त्यांना चोख उत्तर देत होते, पण जेव्हा ग्रेनेड हल्ला सुरू झाला तेव्हा मात्र काही समजायच्या आत त्याचा स्फोट झाला. आणि 10 सीआरपीएफ जवान जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. यातले 2 जवांन गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, तपासाअंतर्गत ही माहिती समोर आली की दगडफेक नव्हती तर ग्रेनेड हल्ला केला जात होता. सगळ्यात गंभीर म्हणजे हे ग्रेनेड अतिशय उच्च तीव्रतेचे होते. ते अत्यंत धोकादायक आणि अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे पाकच्या या खुरापती कधी आणि कशा थांबवायच्या यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.