रोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये !

चांगला रोजगार मिळावा यासाठी पंजाबचा एक तरुण अमेरिकेला गेला पण तिथून थेट गेला तो जेलमध्ये.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2018 10:33 AM IST

रोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये !

अमेरिका, 23 जून : चांगला रोजगार मिळावा यासाठी पंजाबचा एक तरुण अमेरिकेला गेला पण तिथून थेट गेला तो जेलमध्ये. हो, रोजगार मिळण्यासाठी हल्लीची पिढी कसल्याच गोष्टीचा विचार करत नाही. तसंच या तरुणासोबत पण झालं. रोजगार मिळवण्यापाई तो बेकायदेशीररित्या अमेरिकेत शिरला आणि त्याला पोलिसांनी पकडलं.

बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्याने न्यू मेक्सिकोच्या स्थलांतरित कस्टडी केंद्रात त्याला पाठवण्यात आलं. गेले 16 महिने तो या पोलीस कस्टडीमध्ये आहे.

या तरुणाचे वडिल हे पंजाब पोलिसात आहे, तर आई गृहीणी असल्याचं सांगितलं जातय. एका ट्रॅव्हल एजंटने परदेशात कामाला पाठवण्याचं आमिष दाखवून या तरुणाला फसवलं. त्याने बेकायदेशीररित्या म्हणजे टेक्सासमधील अल-पासो जवळ मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आता 16 महिन्यानंतर या तरुणाला जेलबाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पण त्याला फसवणारा एजंट मात्र अद्याप फरार आहे. या तरुणाच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरून, परदेशात जाण्यासाठी त्याने तब्बल 47 लाख रुपये खर्च केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...