S M L

शरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला!

आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खास निरोप राज ठाकरेंना दिल्याची चर्चा आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 20, 2018 03:18 PM IST

शरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला!

मुंबई,ता.20 जून : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज कृष्णकुंजवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेवून चर्चा केली. आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खास निरोप राज ठाकरेंना दिल्याची चर्चा आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय.

महाराष्ट्रात महाआघाडीची चाचपणी करण्यासाठी पवारांनी आव्हाडांना कृष्णकुंजवर पाठवलं असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांची पुण्यात घेतलेली जाहीर मुलाखत चांगलीच गाजली होती. त्यानंतर दोन्ही नेते दोन-तीन वेळा एकत्र आले. त्यामुळं राज यांची शरद पवारांशी आणखी जवळीक निर्माण झाली.

राज ठाकरे आता प्रत्येत भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करत असल्याने भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येवू शकतात का याचा शरद पवार अंदाज घेत आहेत. मनसेला विधानसभा निवडणूकीत यश मिळालेलं नसलं तर तरूणांचा एक मोठा वर्ग हा राज ठाकरेंना मानणारा आहे. त्यामुळं यापुढच्या राजकारणात राज ठाकरे कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा...

तामिळनाडूच्या अनुकृती वासनं पटकावला फेमिना मिस इंडियाचा किताब

Loading...

कठड्याबाहेर उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू !

अमरावतीच्या मनीषा खत्रींना अंबर दिव्याचा मोह आवरेना !

आज जागतिक निर्वासित दिन, प्रश्न अजूनही कायम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 03:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close