अमरावतीच्या मनीषा खत्रींना अंबर दिव्याचा मोह आवरेना !

अमरावतीच्या मनीषा खत्रींना अंबर दिव्याचा मोह आवरेना !

केंद्र सरकारने व्हीआपी कल्चर बंद करण्यासाठी नेत्यांना गाडीवरील अंबर दिवा कायमचा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. पण...

  • Share this:

अमरावती, 20 जून : अमरावतीच्या नव्याने रुजू झालेल्या मनीषा खत्री यांना अंबर दिव्याचा मोह काही आवरला नाही आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या गाडीला लाल दिवा लावला आहे.

व्हीआयपी संस्कृतीला आळा बसावा, हे सरकार सर्वसामान्य माणसाचं वाटावं यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या वाहनवरील दिवा काढून टाकला. या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री ,सर्व मंत्र्यांनी आपल्या वाहनावरील दिवे काढून टाकले.

अमरावतीमध्ये देखील पालकमंत्री प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सुद्धा आपल्या शासकीय वाहनावरील दिवे काढून ठेवले.

राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीला दिली मंजुरी

मात्र अमरावती जिल्हा परिषदेत नव्यानेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या मनीषा खत्री यांनी मात्र आपल्या ’MH27 8561’ या शासकीय वाहनावर अंबर दिवा लावला आहे.

यापूर्वी मनीषा खत्री यांनी त्यांच्या बंगल्यावरील काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांनी राजस्थानातून आणलेल्या गाईचे शेण काढण्यास नकार दिल्याने आचारसंहितेच्या काळात त्यांची मेळघाटात बदली केली होती. मात्र या 2 कर्मचाऱ्यांनी न्यायालयातून या बदलीवर स्टे आणून सीईओना चपराक दिली होती. आणि आता या अंबर दिव्यामुळे पुन्हा मनीषा खत्री चर्चेत आल्या आहेत.

यामुळे एकीकडे पंतप्रधान, मुख्यमंत्री व्हीआयपी संस्कृती बंद करायला निघाले असताना अमरावती जिल्हा परिषद सीईओना मात्र अंबर दिव्याचा मोह आवरेनासा झाला आहे त्यामुळे हा तर खुद्द पंतप्रधानांचाच अपमान आहे अशी कुजबुज जिल्हा परिषद परिसरात होत आहे.

हेही वाचा...

अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे, 2 महिन्यात होणार वेतनवाढ

राज ठाकरेंनी उडवली मोदींच्या फिटनेस चॅलेंजची खिल्ली

अखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी

क्रांतिकारी संशोधन! 'गुगल' सांगणार आता पेशंटच्या मृत्यूची तारिख!

First published: June 20, 2018, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading