कठड्याबाहेर उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू !

ते फिरत असलेल्या पॉईंटला सुरक्षा कठडा असूनही चौहान दाम्पत्य कठड्याबाहेर सेल्फी काढत होते.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2018 08:49 AM IST

कठड्याबाहेर उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू !

माथेरान, 20 जून : पावसाळ्यात कोणत्याही पर्यटन स्थळी आपला जीव धोक्यात घालू नका असं वारंवार सांगत असतानाही सेल्फी काढण्याचा मोह काही केल्या जात नाही आणि त्यातून एक 35 वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला आहे.

दिल्ली येथून माथेरानला फिरण्यासाठी 5 जणांचं चौहान कुटुंब आलं होतं. ते फिरत असलेल्या पॉईंटला सुरक्षा कठडा असूनही चौहान दाम्पत्य कठड्याबाहेर सेल्फी काढत होते. पावसाळी वातावरण असल्याने कड्या किनारी वारे वाहत होते आणि वाऱ्याच्या झोकात सरिता या 600 फूट खोल दरीत कोसळल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा...

अंधश्रद्धेचा बळी!, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं

उंदीरमामा भडकले, एटीएममधील 12 लाख कुरतडले

क्रांतिकारी संशोधन! 'गुगल' सांगणार आता पेशंटच्या मृत्यूची तारिख!

दरम्यान, पोलीस त्वरित घटना स्थळी पोहोचले असून माथेरान मधील सहयाद्री रेस्क्यू टीम आणि हशाची पट्टी येथील आदिवासी यांनी रात्री उशीरापर्यंत महिलेचा शोध घेतला. रात्री उशिरा या मृत महिलेला बाहेर काढण्यात यश आलं.

पावसाळ्यात अशा मृत्यूच्या वारंवार घटना समोर येतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून कोणतेही धोकादायक प्रकार आणि स्टंट करू नका. आपल्या जीव मोलाचा आहे हे लक्षात असू द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 08:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close