मुंबई, 20 जून : आज वर्ल्ड रेफ्युजी म्हणजेच जागतिक निर्वासित दिन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हा दिवस पाळला जातो. यानिमित्ताने घेऊयात जगभरातील निर्वासितांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा.
सीरियातल्या या चिमुरड्याचा समुद्र किनाऱ्यावरचा हा फोटो मध्यंतरी जगभर व्हायरल झाल्याचं आपल्याला आठवतच असेल. किंबहुना या फोटोमुळेच खऱ्या अर्थाने सीरियातील निर्वासितांचा प्रश्न जगासमोर आलाय. सीरियातील निर्वासितांचे हे लोंढे युरोपीय देशांमध्ये आश्रयाला आल्यानंतर तिथं काही काळ मोठा संघर्ष निर्माण झाला होता.आता तिथला तणाव निवळला असला तरी जगभरातील निर्वासितांचा प्रश्न अजूनही कायम आहे. सर्वसाधारणपणे धार्मिक, जातीय वंशवादाच्या छळाला कंटाळून हे लोक दुसऱ्या देशात स्थलांतर करत असतात.
खरं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांनाच जगण्याचा हक्क आहे. पण वंशवाद आणि धार्मिक हिंसेतून कमकुवत वर्गाला भीतीपोटी इतरत्र स्थलांतर करावं लागतं. सीरिया, म्यानमार, अफगणिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये हा प्रश्न खूपच ज्वलंत बनल्याचं बघायला मिळतं. सीरियातून मुस्लिमांना तर म्यानमारमधून रोहिंग्यांना याच वंशवादातून निर्वासितांचं इतरत्र जिणं जगावं लागतंय.
निर्वासितांची आकडेवारी
जगभरातील निर्वासितांची आकडेवारी
प्रत्येक मिनिटाला 20 लोक निर्वासित बनतात
बहुतांश निर्वासित हे सीरिया, अफगणिस्तान, द. सुदान या देशातून येतात
निर्वासितांपैकी 51% लोक 18 वर्षाखालील शालेय मुले
जगभरातील निर्वासितांची लोकसंख्या अंदाजे 6.5 कोटी
तर देशांतर्गंत विस्थापितांची लोकसंख्या 40.3 दशलक्ष
निर्वासितांचा लोंढा आल्यानंतर संबंधीत देशांमध्ये बाहेरचे आणि स्थानिक असा संघर्ष उद्भवतो. भारतामध्येही मध्यंतरी रोहिंगे आणि तिबेटियन आणि बांग्लादेशी निर्वासितांचा प्रश्न चर्चेला येतो. पण अद्याप तरी त्यावर ठोस असा तोडगा निघू शकलेला नाही. कारण निर्वासितांच्या आडून अनेकदा घुसखोरी झाल्याचीही उदाहरणं समोर आलीत.
पण म्हणून काही सर्वच निर्वासितांकडे संशयाच्या दृष्टीने योग्य होणार नाही, एकूणच निर्वासितांच्या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टीने पाहायचं झालं तरी निर्वासितांच्या लोंढ्यामुळे अनेकदा आश्रयाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडतो. बेरोजगारीचीही समस्या उद्धवते. म्हणूनच निर्वासिताचं स्थलांतरच होणार नाही. अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी संबंधीत देशांवर कठोर निर्बंधही घातले जावेत. तेव्हा कुठे हा प्रश्न सुटू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afaganistan, Refugee, Syria, World refugee day