जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / तामिळनाडूच्या अनुकृती वासनं पटकावला फेमिना मिस इंडियाचा किताब

तामिळनाडूच्या अनुकृती वासनं पटकावला फेमिना मिस इंडियाचा किताब

तामिळनाडूच्या अनुकृती वासनं पटकावला फेमिना मिस इंडियाचा किताब

29 स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीने हा किताब पटकावलाय. दरम्यान यंदाची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्या हस्ते अनुकृतीला ‘मिस इंडिया’ चा मुकुट प्रदान करण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 20 जून : फेमिना मिस इंडिया 2018 या अतिशय मानाच्या स्पर्धेचं विजेतेपद तामिळनाडूच्या अनुकृती वास हिने पटकावलंय. 29 स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीने हा किताब पटकावलाय. दरम्यान यंदाची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्या हस्ते अनुकृतीला ‘मिस इंडिया’ चा मुकुट प्रदान करण्यात आला. मुंबईतल्या एनएससीआय स्टेडियममध्ये ही ‘मिस इंडिया’ स्पर्धा पार पडली. तर याच स्पर्धेत  हरयाणाची मीनाक्षी चौधरी ही प्रथम उपविजेती ठरलीय. आणि आंध्र प्रदेशची श्रेया राव ही दुसरी उपविजेती ठरली आहे. या समारंभाला सिनेअभिनेते, अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. हेही वाचा ‘फेमिना मिस इंडिया’ सोहळ्याला हे सेलिब्रिटीज् उपस्थित होते अनुकृती तामिळनाडूमधील लोयोला महाविद्यालयातून फ्रेंच या विषयात पदवीचं शिक्षण घेत आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात रस आहे. ती अॅथलीटसुद्धा आहे. ‘मला टॉमबॉयसारखं राहायला आवडतं. त्याचप्रमाणे साहसी खेळ आणि बाईक चालवणं खूप आवडतं,’ असं ती म्हणते. यासोबतच विविध ठिकाणी फिरण्यात, नवनव्या गोष्टी शिकण्यात ती पुढाकार घेते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात