मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईतून धक्कादायक बातमी, पोलिसांपाठोपाठ IAS-IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतून धक्कादायक बातमी, पोलिसांपाठोपाठ IAS-IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतील मंत्रालयाजवळील 'यशोधन' इमारत ही शासकीय आयएएस आणि आयपीएस अधिकारी यांचं निवासस्थान आहे.

मुंबईतील मंत्रालयाजवळील 'यशोधन' इमारत ही शासकीय आयएएस आणि आयपीएस अधिकारी यांचं निवासस्थान आहे.

मुंबईतील मंत्रालयाजवळील 'यशोधन' इमारत ही शासकीय आयएएस आणि आयपीएस अधिकारी यांचं निवासस्थान आहे.

मुंबई, 20 मे : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांसह कर्तृव्य बजावत असताना पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. परंतु, आता मुंबई एका महिला आयएएस अधिकारी आणि तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईतील मंत्रालयाजवळील 'यशोधन' इमारत ही शासकीय आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचं निवासस्थान आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या आयएएस महिला अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न आलं आहे.

हेही वाचा -बापरे! परवानगीला लागले तब्बल 5 दिवस, नातेवाईकांना ताब्यात मिळाला कुजलेला मृतदेह

या महिलेच्या संपर्कात आल्यामुळे आयपीएस असलेल्या तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित अधिकारी इमारतीच्या ज्या मजल्यावर राहत होते, तो मजला पूर्णपणे सील केला आहे.

या इमारतीत अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी राहत असून पालिकेनं इमारत सील करण्याऐवजी मजला सील केल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच खबरदारी म्हणून या इमारतीतून कुणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच, अत्यावश्यक वस्तूंची गरज भासल्यास त्या बाहेरून आणून देण्यात येणार आहे. पुढील 14 दिवसांत कुणामध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास तात्काळ संपर्क करावा, असं आवाहनही पालिकेकडून करण्यात आलं आहे.

क्वारंटाइन सेंटर म्हणून SRA इमारती पालिकेच्या ताब्यात

दरम्यान, मुंबईत भविष्यात रुग्णांची संख्या अधिक वाढली तर पर्यायी व्यवस्था म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) यांनी देखील तयार असलेल्या इमारती या रुग्णांच्या सोयीसाठी दिल्या आहेत. चेंबूर, अंधेरी, गोरेगाव, मुलुंड अशा वेगवेगळ्या भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या 20 पेक्षा जास्त मजल्यांच्या अनेक इमारती तयार असून साधारणपणे मुंबई परिसरात 2008 फ्लॅट्स तयार झाले आहेत.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांनी लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

सध्या ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं ही सौम्य प्रमाणात आहे किंवा लक्षणं विरहीत आहेत, अशा रुग्णांना या इमारतीमध्ये विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी दिली.

First published:

Tags: BMC, Dharavi, Mumbai, Police, Worli, मुंबई