बापरे! परवानगीला लागले तब्बल 5 दिवस, नातेवाईकांना ताब्यात मिळाला कुजलेला मृतदेह

बापरे! परवानगीला लागले तब्बल 5 दिवस, नातेवाईकांना ताब्यात मिळाला कुजलेला मृतदेह

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांसोबतच नॉन कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचीही विटंबना होत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मे: राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. कोरोनाबाधित रुग्णांसह मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एक धक्कादायक तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांसोबतच नॉन कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचीही विटंबना होत आहे. तब्बल पाच दिवसांनी कुजलेला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला आहे.

हेही वाचा..पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला, एका दिवसात 10 जणांचा मृत्यू

नेमकं काय आहे प्रकरण?

मीरा-भाईंदरहून चालत वसईला जाऊन राजस्थानला जाणारी रेल्वे ट्रेन पकडण्याच्या घाईत एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या मृताच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह मिळवण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. अखेर पाचव्या दिवशी प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर कुजलेला मृतदेह घेऊन नातेवाईक राजस्थानला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे भाईंदर येथे राहणारे हरिश्चंद्र शंकरलाल जांगीर (वय-45) यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. आर्थिक विवंचनेत सापडलेले हरिश्चंद्र जांगीर आपल्या गावी राजस्थानात जाण्यासाठी 14 मे रोजी मीरा-भाईंदरहून चालत वसईला निघाले. वसईवरून राजस्थानसाठी रेल्वे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. खिशात पैसे नसल्याने हरिश्चंद्र जांगीर यांनी उपाशी पोटी भाईंदर ते वसई असा पायी प्रवास केला. वसईत पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एकही नातेवाईक जवळ नसल्याने हरिश्चंद्र जांगीर यांचा मृतदेह विरारमधील शीत शवागृहात ठेवण्यात आला होता. पण या शीतगृहाचे तापमान आवश्यकतेनुसार नसल्याने हरिश्चंद्र यांचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा..भीषण अपघात! भरधाव ट्रकनं भाजी विक्रेत्या 6 शेतकऱ्यांना चिरडलं

हरिश्चंद्र यांचे भाऊ जयप्रकाश जांगीर हे 17 मे रोजी विरार येथे पोहोचले. विरार पश्चिम येथे असलेल्या शीतशवागृहात जाऊन पाहिले तर शीतगृहातील वातानुकूलित यंत्रणा नियमित काम करत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तापमान 5 ते 6 अंश सेल्सियस असणे आवश्यक असताना त्याचे तापमान 18 अंश सेल्सियस होते. यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती.

दुसरीकडे महापालिकेने कोविड 19 च्या तपासणीसाठी नमुने 2 दिवसांनी घेतल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास उशीर झाला. अहवाल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाऊ शकत नसल्याचे महापालिकेने सांगितलं. तसेच विरारमधेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सक्ती केली गेल्याचा आरोपही जयप्रकाश जांगीर यांनी केला आहे. मात्र, त्यांना आपल्या गावीच अंत्यसंस्कार करायचे असल्याने कोविड 19 तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली. अखेर मंगळवारी रुग्णवाहिकेने जयप्रकाश जांगीर हे आपल्या भावाचा मृतदेह घेऊन राजस्थानकडे रवाना झाले.

First published: May 20, 2020, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading