मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाच्या Lockdown मध्ये यांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आले हजारो हात...

कोरोनाच्या Lockdown मध्ये यांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आले हजारो हात...

कोरोनामुळे नाही तर भुकेने मरायची वेळ येईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण काही जाणते आणि संवेदनशील हात सरसावले आणि आज मुंबईत हजारोंना ताजं, सकस, शिजवलेलं अन्न घरपोच मिळण्याची सोय झाली आहे.  प्रेरणा देणारी आणि तुमच्याकडूनही काही मागणारी.

कोरोनामुळे नाही तर भुकेने मरायची वेळ येईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण काही जाणते आणि संवेदनशील हात सरसावले आणि आज मुंबईत हजारोंना ताजं, सकस, शिजवलेलं अन्न घरपोच मिळण्याची सोय झाली आहे. प्रेरणा देणारी आणि तुमच्याकडूनही काही मागणारी.

कोरोनामुळे नाही तर भुकेने मरायची वेळ येईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण काही जाणते आणि संवेदनशील हात सरसावले आणि आज मुंबईत हजारोंना ताजं, सकस, शिजवलेलं अन्न घरपोच मिळण्याची सोय झाली आहे. प्रेरणा देणारी आणि तुमच्याकडूनही काही मागणारी.

पुढे वाचा ...
  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 21 एप्रिल : एकीकडे Coronavirus च्या वाढत्या विळख्यात एकमेकांवर संशय घेत आपापल्या घरात राहून माणसं दुरावतात की काय अशी भीती वाटत असताना दुसरीकडे मात्र या संकटाला तोंड देण्यासाठी एकमेकांची दुरूनच  का होईना पण मदत करणाऱ्यांच्या बातम्या ऊर्जा देत आहेत. मुंबईच्या गोवंडीनजिकच्या दाट लोकवस्तीच्या आणि बकाल वस्तीत कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक. त्यात लॉकडाऊनमध्ये सगळं शहर ठप्प. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या वस्त्यांमधल्या लोकांना कोरोनामुळे नाही तर भुकेने मरायची वेळ येईल अशी भीती वाटत होती. पण काही जाणते आणि संवेदनशील हात सरसावले आणि आज हजारोंना ताजं, सकस, शिजवलेलं अन्न घरपोच मिळण्याची सोय झाली आहे. ही गोष्ट आहे मुंबईच्या सर्वात मोठ्या कचराकुंडीवर वसलेल्या वस्तीची. प्रेरणा देणारी आणि तुमच्याकडूनही काही मागणारी.

मुंबईच्या गोवंडी या उपनगरात बैगनवाडी नावाची वस्ती आहे. पूर्वीच्या कचराडेपोवर छोटे छोटे रस्ते करून, भाग करून वसवलेली ही वस्ती. अर्थातच हातावर पोट असलेले मजूर, कामगार, रिक्षा, टॅक्सीचालक असे हजारो लोक या वस्तीत राहतात. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या हाताचं काम गेलं किंवा थांबलं. कामासाठी बाहेर पडणं मुश्कील झालं आणि जेवणाचं काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा राहिला.

बैगनवाडीचं अस्तित्व लक्षात आलं आसपासच्या तुलनेनं उच्चभ्रू वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पण संवेदनशील असणाऱ्या काही लोकांना. त्यांनी एकत्र येऊन कम्युनिटी किचन इथेच सुरू करण्याची कल्पना मांडली. सोशल मीडियातून आवाहन करून त्यासाठी निधी गोळा केला. क्राउड फंडिंगच्या माध्ममातून अवघ्या 10 दिवसात 28 लाख रुपये गोळा झाले. याच वस्तीत उभं राहिलं लोकांनीच लोकांसाठी चालवलेलं किचन. फीडिंग फ्रॉम फार' नावाने हा उपक्रम सुरू झाला.

वाचा - वृद्धाश्रमांची दैनावस्था, लॉकडाऊनमध्ये दान करणाऱ्यांच्या संख्येत झाली मोठी घट

"गोवंडीच्या या वस्तीतच स्थानिक लोकांच्या मदतीने किचनची जागा तयार झाली. उभ्या राहिलेल्या निधीतून दररोजचं धान्य, भाज्या इत्यादी माल इथे येऊ लागला आणि कामाच्या शोधात असणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच किचनची जबाबदारी घेतली. मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून इथे अन्न शिजतं आणि इथेच पॅक करून घरोघरी पोहोचवलं जातं. या वस्तीतच राहणारे कार्यकर्ते मिळाल्याने त्यांनाच स्वयंसेवक करून घेतलं आणि त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेचे धडे देत गरजूंपर्यंत जेवण पोहोचवायचं काम दिलं", असं या उपक्रमाचे जनक सांगतात.

" isDesktop="true" id="448769" >

Feeding From Far चे परितोष पंत म्हणाले, "आम्ही इथल्या गरजू लोकांना दोन्ही वेळचं जेवण देतो. त्यांचा दररोजचा खर्च माणशी 60 रुपये आहे. यामध्ये भाज्या, धान्य वगैरे खर्च आणि करण्याचा खर्च धरलेला आहे. सध्या अशा 5000 गरजवंतांची दोन्ही वेळची भूक दररोज भागवतो आहोत. आता 10000 जणांना जेऊ घालू शकेल अशी स्वयंपाकाची जागा आणि क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. "

हा उपक्रम सुरू झाल्यापासून 'फीड फ्रॉम फार'च्या स्वयंसेवकांनी 1,70,000 जेवणाची पॅकेट्स पुरवली आहेत. 50,000 गरजू लोकांना दोन वेळचं जेवण पुरवायचं त्यांचं लक्ष्य आहे. त्यासाठी मदत करण्याचं आवाहन परितोष यांनी केलं आहे.

मदत करण्याची इच्छा आहे अशांनी Feeding from Far च्या या लिंकवर क्लिक करावं. इथे कुठल्या स्वरूपात दान करता येईल याची सविस्तर माहिती आहे.

(संपादन, संकलन - अरुंधती)

अन्य बातम्या

मजुराचा मृतदेह घरी आणण्यास पैसे नाहीत, प्रतिकात्मक पुतळ्यावर केले अंत्यसंस्कार

डब्बेवाले, उद्योजक आणि कलाकारांचं कोरोनावर नवं गाणं, पाहा VIDEO

...आणि रतन टाटांनी 'ती' खंत बोलून दाखवली, म्हणाले.

First published:

Tags: