मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

...आणि रतन टाटांनी 'ती' खंत बोलून दाखवली, म्हणाले...

...आणि रतन टाटांनी 'ती' खंत बोलून दाखवली, म्हणाले...

टाटा ट्रस्ट – केवळ टाटा ट्रस्टचं नाही तर यात जेएन टाटा एंडोमेंट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, लेडी टाटा मेमोरिअल ट्रस्ट, लेडी मेहरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट, जेआरडी आणि थेल्मा जे टाटा ट्रस्ट आदी महत्त्वपूर्ण नावांचा समावेश आहे. या संस्था गेल्या अनेक दशकांपासून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संरक्षण, सामुदायिक विकास आदी क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. टाटा समूह देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून देशाचा विचार करीत होती. त्याचकारणास्तव जमशेद जी टाटा यांनी 1898 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची उभारणी केली. याचा उद्देश विज्ञानातील अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था करणं आहे.

रतन टाटा यांना आर्किटेक्ट व्हायचे होते. पण, त्यांचे वडील हे त्यांना इंजिनिअर बनवू इच्छित होते. त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर रतन टाटा इंजिनिअरिंगलाही गेले. पण...

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 21 एप्रिल : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्याबद्दल बोलावे तितके कमी आहे. राज्यावर कोरोना सारखे संकट आले असता त्यांनी सढळ हाताने मदत करून आदर्श निर्माण करून दिला. एवढंच नाहीतर त्यांनी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसाठी मुंबईतील हॉटेल्सही मोकळे करून दिले. आयुष्यात अमाप कमाई केल्यानंतरही रतन टाटा यांनी लहानपणापासून मनात दडून राहिलेली खंत बोलून दाखवली.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत सोमवारी  फ्युचर ऑफ डिझाईन अँण्ड कन्स्ट्रक्शन या विषयावर एक वेबिनार पार पडलं. या वेबिनारमध्ये रतन टाटा यांनी मुंबईच्या रचनात्मक बाबीवर परखड भाष्य केलं.

'मुंबईत लोकांना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, त्यांना शुद्ध हवाही मिळत नाही. एकमेकांना खेटून झोपड्या उभारण्यात आल्या आहे. काही ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या करण्यात आल्या आहे. झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी उंच इमारती उभारल्या खऱ्या पण  त्यांना पायाभूत सुविधाही मिळत नाही. लोकं तशीच दाटीवाटीने राहत आहे, आपण याला समाज म्हणतोय, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे', असं परखड मत रतन टाटा यांनी मुंबई शहराबद्दल व्यक्त केले आहे.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, या 2 महत्त्वपूर्ण विषयांवर झाली चर्चा

यावेळी रतन टाटा यांनी लहानपणापासून मनात राहिलेली एक खंतही बोलून दाखवली.  रतन टाटा यांना आर्किटेक्ट व्हायचे होते. पण, त्यांचे वडील हे त्यांना इंजिनिअर बनवू इच्छित होते. त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर रतन टाटा इंजिनिअरिंगलाही गेले. पण, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांना लक्षात आले की, आपली वाट चुकली आहे. आपण आर्किटेक्टच व्हायला हवं होतं, असं रतन टाटा यांनी सांगितलं.

पुढे चालून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून दिले आणि आर्किटेकचे शिक्षण घेतले. परंतु, ज्या इच्छेखातर आर्किटेक झालो त्यामध्ये कामच करता आले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा - मृत्यूशी झुंज देत आहे भारताचा चॅम्पियन खेळाडू, लॉकडाऊनमुळे थांबले कॅन्सरचे उपचार

रतन टाटा यांनी अमेरिकेतील कॉर्नेल आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून 1959 आर्किटेक्चरची पदवी घेतली होती. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व कामं केली. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली होती.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Mumbai, Ratan tata